घरमनोरंजन'भुलभुलैय्या' च्या सिक्वेलमध्ये दिसणारी 'ही' अभिनेत्री; ९० च्या दशकात होती सुपरस्टार!

‘भुलभुलैय्या’ च्या सिक्वेलमध्ये दिसणारी ‘ही’ अभिनेत्री; ९० च्या दशकात होती सुपरस्टार!

Subscribe

२००७ साली आलेल्या ‘भुलभुलैय्या’ या चित्रपटाचे सगळेच फॅन आहेत. आता लवकरच ‘भुलभुलैय्या’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माता भूषण कुमार या चित्रपटाची निर्मीती करणार आहेत. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणी कार्तिक आर्यनच्या अपोझिट दिसेल. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे जीने ९० च्या दशकातील काळ गाजवला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तब्बू आहे.

- Advertisement -

खुद्द कियाराने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तब्बू आहे. कियाराने तब्बूचा फोटो शेअर करत ‘मी तब्बूसोबत भुलभुलैय्या चित्रपटाचे शूट करण्यासाठी फार उत्सुक आहे’ असे कॅप्शन दिले आहे. तब्बूची ‘भुलभुलैय्या’मधील एण्ट्री हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे. कदाचित या पूर्वी कधीही न बघितलेल्या भुमिकेत दिसू शकते.

‘भुलभुलैय्या’ हा मुळात २००५चा तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’चा रिमेक आहे. तर ‘चंद्रमुखी हा चित्रपटदेखील १९९३ च्या ‘मणीचित्रथाझु’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. भुलभुलैय्या मध्ये अक्षय कुमार, विद्या बालन,अमिषा पटेल, शायनी आहूज या तगड्या स्टार कास्ट आणि अभिनयामुळे चित्रपट सुपरहिट ठरला आता भुलभुलैय्या दोन कडे सगळ्यांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -