म्हणून लतादीदी यांच्या ‘या’ चाहत्यांने केले नाही लग्न!

Uttarakhand
This UP man stayed single all his life because of Lata Mangeshkar
लतादीदी

आपण अनेक कलाकारांचे वेडेसर असे चाहते पाहिले आहेत. पूर्वी पासून चाहते आपल्या आवडत्या कलाकरांसाठी रक्ताने पत्र लिहिण्यापासून ते त्या कलाकारांचा पाठलाग करण्याचे किस्से ऐकले आहेत. आज आपण अशा एका चाहत्याची कहाणी पाहणार आहोत. मेरठमधील हा चाहता आहे. गौरव शर्मा असे या चाहत्याचे नाव आहे. ३६ वर्षीय गौरव शर्मा हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जबरा फॅन आहे. लता मंगेशकर यांच्या गायनांवरील त्यांचे अतुलनीय प्रेम हे त्याच्या घरी असलेला संग्रहातून दिसून येते. लता मंगेशकर यांच्यावर गौरव यांचे प्रेम इतके आहे की त्यांनी या प्रेमाखातर अद्यापही लग्न केलेले नाही. ते लता मंगेशकर यांच्या फोटोंसोबत एकटे घरी राहतात. तसेच त्यांनी त्याच्या आयुष्यात लता मंगेशकर यांना सोडून दुसऱ्या महिलेसाठी जागा नाही आहे, असा दावा केला आहे.

लता मंगेशकर यांच्यावर आधारलेली अनेक पुस्तके गौरव यांच्याकडे आहेत. तसेच त्यांच्याकडे लता मंगेशकर यांच्याबद्दल बरीच पुस्तके संग्रहात आहेत ज्यामध्ये पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियन लेखकांनी लिहिलेली देखील सगळी पुस्तके आहेत. लता मंगेशकर यांनी गायलेली प्रत्येक गाण्यांची सीडी गौरव यांनी संग्रही केली आहे. गौरव हे जेव्हापासून सोशल मीडिया वापरू लागले तेव्हापासून ते लता मंगेशकर यांचे टि्वट देखील गोळा करून लागले. जेणे करून ते हटविले गेले तर ते त्यांच्याकडे जपून राहिल म्हणून ते टि्वट गोळा करू लागले.

लता मंगेशकर यांच्या असा कट्टर चाहता आपण कधी पाहिला नसेल. गौरव यांच्या घरात ठिकठिकाणी लता मंगेशकर यांचे फोटो आहेत. जेव्हा ते लता मंगेशकर यांना भेटले तेव्हा ते १० मिनिटे फक्त रडत होते. गौरव यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत ४ तास घालवण्याची संधी मिळाली आहे. लता मंगेशकर यांची प्रत्येक आठवण त्यांनी जपून ठेवली आहे.

उत्तर प्रदेशमधील शिक्षण विभागात गौरव नोकरी करतात. त्यांनी पहिल्यांदा वयाच्या सहाव्या वर्षी लता मंगेशकर यांचे गाणे ऐकले. त्याचक्षणी पूर्ण आयुष्य लता मंगेशकर यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला.