मुंबईकरांसाठी तीन दिवस ‘लोकरंग’चा आनंद

‘महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास’ या संस्थेच्या निमित्ताने ‘श्री महाराष्ट्र देशा’ कार्यक्रमाचे आयोजन

Mumbai

लोककलेचा पूर्वापार इतिहास तपासून पाहिला तर, लोकसंस्कृती हे मानवी जीवनाच्या जगण्याचे साधन होते. विरंगुळा म्हणून अविष्कार सादर करायचा आणि आत्मिक आनंद मिळवायचा असे काही दशकांपूर्वी त्याचे स्वरूप होते. पुढे माणसाची जीवनशैली बदलली आणि हीच लोकसंस्कृती त्यांच्या मनोरंजनाचे साधन झाले. आता मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत म्हणताना लोकसंस्कृतीचे स्वरूपही पूर्णपणे बदललेले आहे.

‘महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास’ या संस्थेच्या निमित्ताने ‘श्री महाराष्ट्र देशा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गेली १९ वर्षे ‘लोकरंग महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत असून यंदा एकोणीसावा महोत्सव २६, २७ आणि २८ जून २०१९ या दिवशी माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात रोज रात्री ८.३० वाजता होणार आहे. मुंबईकरांना हे तीन दिवस ‘लोकरंग’चा आनंद विनामूल्य घेता येणार आहे.

‘श्री महाराष्ट्र देशा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकसंगीताचे आणि लोककलेचे दर्शन नृत्य-गायनाच्या माध्यमातून २६ आणि २८ जून या दिवशी घडवले जाणार आहे. प्रत्येकवर्षी नवीन अविष्कार हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य असून २७ जूनला लोकसंगीतात वाजवल्या जाणार्‍या नव्या दुर्मिळ वाद्यांचा एकत्रित विलोभनिय अविष्कार ‘फोक वॅगन’ या शिर्षकात सादर केला जाणार आहे.