घरमनोरंजनप्रेक्षकांना भेटायला येणार ‘ती and ती’

प्रेक्षकांना भेटायला येणार ‘ती and ती’

Subscribe

‘ती and ती’ चित्रपटामध्ये अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या तिघांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

मराठी चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी विविध विषयांच्या हटके मांडणीची मेजवानीच. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे विषय आणि त्यांची मांडणी यांचं स्वरुप खूपच बदललं आहे. अशाच एका वेगळ्या धाटणीचा एक चित्रपच लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. ‘ती and ती’ असं या चित्रपटाचं नाव असून अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या तिघांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. नुकतेच ‘ती and ती’ चे पहिले टीझर पोस्टर रिलीज झाले असून, सध्या ते सोशल मीडियावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत आहेत. या पोस्टरवर पुष्कर, प्रार्थना आणि सोनालीचा हटके लूक पाहायला मिळतोय. याशिवाय पोस्टरमध्ये हे तिघं फिरत असलेलं ठिकाण परेदशातील असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे ‘ती and ती’ हा चित्रपट तीन मराठी पात्रांची परदेशातील कहाणी असल्याची चर्चा सध्या रंगते आहे. दरम्यान, ‘ती and ती’च्या चित्रपटाच्या निमित्ताने पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

‘रोमँटिक अॅडव्हेंचर’ची गोष्ट

‘ती and ती’ चित्रपटातील प्रमुख अभिनेता पुष्कर जोग याने काही दिवसांपूर्वी, ‘आम्ही तिघं लवकरच तुमच्या भेटीला येत आहोत’, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी कोण तिघं आणि कधी हे त्याने स्पष्ट न केल्यामुळे प्रेक्षकांची याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली होती. आता मात्र त्यामागचं गुपित उघड करत पुष्करने ‘ती and ती’ चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवरुन शेअर केलं आहे. ‘Life मध्ये एखादं गोड Adventure असलं की जगायला आणखीनच मजा येते, नाही का? तयार राहा या Romantic Adventure साठी’… असं कॅप्शन त्याने ही पोस्ट शेअर करतेवेळी दिलं आहे.

- Advertisement -

पुढील वर्षी येणार भेटीला

‘ती and ती’ हा चित्रपट पुढील वर्षी १ मार्च २०१९ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून अभिनयासोबत पुष्करने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेन्मेंट आणि हायपरबीस मीडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्करसोबतच आनंद पंडीत आणि मोहन नादर हेदेखील सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा लंडन शहरात घडते त्यामुळे सहाजिकच चित्रपटाचं बहुतांशी शूटिंग हे लंडनमध्येच झालं आहे. थोडक्यात ‘ती and ती’च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना घरबसल्या लंडनची वारी होणार आहे. जेव्हा प्रेमाचा ट्रँगल बनतो तेव्हा सगळ्याच गोष्टींची गुंतागुंत वाढते. समज-गैरसमजाचं जाळं वाढतं. अशाच गोंधळ उडालेल्या एका तरुणाची कथा आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या ‘त्या’ दोघी असा एकंदर धमाल आणि प्रेमळ प्रवास ‘ती & ती’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -