घरमनोरंजनहोते आहे व्हायरल, टायगरची हवेतील रोल जंप

होते आहे व्हायरल, टायगरची हवेतील रोल जंप

Subscribe

अभिनयाव्यतिरिक्त टायगरकडे अॅक्शनचंही जबरदस्त कौशल्य आहे. त्यानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला कमी वेळात खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफनं फारच कमी कालावधीमध्ये बॉलीवूडमध्ये आपला जम बसवला आहे. इतकंच नाही तर त्यानं स्वतःची अशी वेगळी ओळखही निर्माण केली आहे. अभिनयाव्यतिरिक्त टायगरकडे अॅक्शनचंही जबरदस्त कौशल्य आहे. ज्यामुळं इतर बॉलीवूड कलाकारांपेक्षा त्याचं वेगळेपण सिद्ध करते. टायगर आतापर्यंत नेहमीच अॅक्शन चित्रपटांमध्ये दिसला आहे. इतकंच नाही तर टायगर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच सरावाचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. असाच एक जबरदस्त व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये टायगर हवेत रोल जंप घेत आहे. हा व्हिडिओ बघताना नक्कीच तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण टायगर सरावनं हे स्टंट उत्तमरित्या करत आहे.

The sunday effect #failll ??? #hadtoredeemmyself #izzatkasawaal ?

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

- Advertisement -

टायगरनं पोस्ट केला व्हिडिओ

टायगरनं आपल्या सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हवेत संपूर्ण ३६० डिग्री अंशामध्ये टायगर रोल जंप करताना दिसत आहे. ही उडी अतिशय कठीण असूनही टायगरनं सर्कल पूर्ण केल्याचं दिसत आहे आणि ही उडी पूर्ण करूनही अतिशय आरामात तो पुन्हा आपल्या पायावर उभा राहताना दिसत आहे. याची खास गोष्ट अशी की, टायगरनं स्वतः हा व्हिडिओ पोस्ट करताना, ‘हवेतल्या हवेत स्वतःला मिठी मारण्याचा एक प्रयत्न’ अशी कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टायगरनं पोस्ट केलेला हा व्हिडिओ नेटिझन्सना प्रचंड प्रमाणात आवडत असल्याचं दिसत आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला २० तासात १२ लाखापेक्षाही अधिक जास्त वेळा लोकांनी पाहिलं आहे.

….tried hugging myself in mid-air ?? #aka #cork360

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

- Advertisement -

टायगर चित्रपटांमध्ये व्यग्र

सध्या टायगर श्रॉफ आपल्या येणाऱ्या ‘स्टुंडट ऑफ द इयर २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटातून चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि अभिनेत्री तारा सुतरिया या दोघी पदार्पण करत आहेत. हा चित्रपट पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करत असून पुढच्या वर्षी १० मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाय ‘बागी ३’ मध्येही टायगरच दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -