घरताज्या घडामोडीVideo: बाबा जॅक्सन आणि वरुणचा मुकाबला व्हायरल

Video: बाबा जॅक्सन आणि वरुणचा मुकाबला व्हायरल

Subscribe

मल्याळम अभिनेत्री प्रिया वॉरियर आणि रानू मंडल नंतर आता टिक-टॉक स्टार युवराज सिंह ऊर्फ बाबा जॅक्सन रातोरात स्टार झाला आहे. त्याच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहेत. या बाबा जॅक्सनचे व्हिडिओ बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी देखील शेअर केले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन आणि डान्सचा किंग आणि अभिनेता हृतिक रोशन यांनी युवराजचे कौतुक केलं आहे. यानंतर युवराजने आगामी ‘इंडियास बेस्ट डान्सर’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये ऑडिशन दिली. आता तो ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ या चित्रपटातील कलाकारांसोबत धमाल करता ना दिसत आहे.

- Advertisement -

सध्या युवराजचा ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ या चित्रपटातील कलाकारांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये युवराज ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ या चित्रपटातील ‘मुकाबला’ या गाण्यावर त्यांच्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री श्रद्धा कपूर, पुनीत, राघव आणि सलमान यांच्यासोबत युवराज या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

वरुण धवनने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सर्व कलाकार युवराजसोबत मज्जा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना वरुण धवनने असं लिहिलं, ‘बाबा जॅक्सन म्हणून ज्याला ओळखतात त्याच्यासोबत. खऱ्या स्ट्रीट डान्सरसोबत खूप मज्जा आली. अशाप्रकारे इंटरनेटवर धुमाकूळ करत रहा.’

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्राची लाडकी सून होणार सासूबाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -