घरमनोरंजनसलमान खानच्या स्टेप्स मॅच करणं कठीणच...

सलमान खानच्या स्टेप्स मॅच करणं कठीणच…

Subscribe

 

‘या’ व्हिडिओतून होतंय सिद्ध सलमानला मॅच करणं कठीण

- Advertisement -

सलमान खान आणि नृत्यातील त्याच्या अदा हे वेगळंच समीकरण आहे. सलमान आणि जॅकलिनचं ‘हिरिये’ हे ‘रेस ३’ मधील गाणं नुकतंच रिलीज झालं. लोकांना यातील सलमान आणि जॅकलिनची केमिस्ट्री खूपच आवडत असल्याचं सध्याच्या ट्रेंडिंगवरून दिसून येतंय. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सलमानने केलेल्या नृत्याला यामध्ये जॅकलिन मॅच करू शकत नाहीये. हे वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसला ना? पण आम्ही तुमच्यासाठी जो व्हिडिओ घेऊन आलो आहोत, त्यातून हे नक्कीच सिद्ध होतंय.
सलमान खान हा एक मस्तमौला अभिनेता असून प्रत्येक गाण्यामध्ये तो आपली अशी एक वेगळी एनर्जी देत असतो. हिरिये हे गाणंदेखील याला अपवाद नाही. नुकतंच मागच्या आठवड्यात हे गाणं रिलीज झालं आणि सलमानच्या स्टेप्स परत एकदा लोकांना विशेषतः लहान मुलांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केलीय. जॅकलिन हीदेखील चांगली नृत्य करते. पण सलमानबरोबर या गाण्याचं शूटिंग चालू असताना सलमानच्या एनर्जीला मॅच करणं तिला कठीण जात होतं हे या व्हिडिओमधून दिसतंय. डिझायनर अॅशले रिबेलोने शूटिंगदरम्यानचा हा व्हिडिओ आपल्या इन्स्टावर पोस्ट केला आहे. सलमान आपल्याच धुंदीत आणि मनमौजी या गाण्याचं शूट करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सलमान आणि जॅकलिनचा ‘रेस ३’ हा दुसरा एकत्रित काम केलेला चित्रपट असून यापूर्वी त्यांच्या ‘किक’ या चित्रपटातील केमिस्ट्रीलादेखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. दरम्यान रेस ३ हा चित्रपट जून महिन्यात ईदला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

(सौजन्य – अॅशले रिबेलो – इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -