‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने केला भाजपामध्ये प्रवेश!

Mumbai

दाक्षिणात्य अभिनेत्री नमिताने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत तीने भाजपमध्ये प्रवेश केला. नमिताबरोबर राधा रवी यांनी भाजपात प्रवेश केला. जे.पी नड्डा शनिवारी चेन्नईच्या दौऱ्यावर होते. यावेळी नमिता आणि राधा रवी यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले.

बिल्ला, इंग्लिश करन, जगन मोहिनी यासारख्या चित्रपटांत अभिनेत्री नमिताने काम केले आहे. नमिता यांनी २००१ मध्ये मिस सुरतचे जेतेपद जिंकले तर मिस इंडियाची उपविजेती राहिल्या. नमिता यांचे दक्षिण भारतात मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री नयनताराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं होते. आता राधा रवी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

दक्षिणभारतात नमिताचे जबरदस्त चाहते आहेत. कोयंमतूरमध्ये एका चाहत्याने नमिताचे मंदिर उभारले होते. ग्लॅमरस आणि बोल्ड अंदामुळे नमिता यांचा मोठा चाहतावर्ग असून लोकांमध्ये त्या चर्चेत असतात.