लवकरच ‘टॉम अँड जेरी’ नव्या ट्वीस्टसह प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहून चाहते इमोशनल

tom and jerry film trailer going viral fans emotional many reactions
लवकरच 'टॉम अँड जेरी' नव्या ट्विस्टसह प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहून चाहते झाले इमोशनल

९०च्या दशकामध्ये कोणत्याही लहान मुलाला विचारले की, तुझे आवडते कार्टुन कोणते? तर सर्वांचे उत्तर एकच असायचे टॉम अँड जेरी. विना डायलॉग्स फक्त आणि फक्त मजेशीर ट्यून आणि अॅनिमेशनच्या जोरावर या कार्टुने सर्वांच्या मनात एक वेगळीच जाता बनवली आहे. कित्येक वर्षांपासून या कार्टुन शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. आता कित्येक वर्षांनंतर ‘टॉम अँड जेरी’ पुन्हा येत आहे. पण एका ट्विस्टसोबत येत आहे.

आता ‘टॉम अँड जेरी’ आपल्या टीव्ही स्क्रीनवरील छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या लोकप्रिय कार्टुनवर एक चित्रपट तयार होत आहे. सोशल मीडियावर ‘टॉम अँड जेरी’ चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. ट्रेलरमध्ये टॉम आणि जेरीला आता एका खऱ्या जगात जागा मिळाली आहे. आता माणसांमध्ये टॉम आणि जेरी कसे स्वतःला सांभाळून घेतात, कसे दोघे मस्ती करतात हे सर्व चित्रपटात दाखवले जाणार आहे.

या चित्रपटाची पूर्ण शूटिंग न्यूयॉर्कमध्ये झाली असून लोकेशन एक हॉटेल आहे. कथेमध्ये एका शाही लग्नाचे बॅकड्राप आहे. या लग्नात कसे टॉम आणि जेरी मस्ती करतात हे दाखवले आहे. टॉम अँड जेरीचा हा ट्रेलर पाहून अनेक चाहते इमोशनल झाले आहेत. बऱ्याच काळानंतर सर्वांचे आवडते कार्टुन भेटीला येत आहे. २०२१मध्ये टॉम अँड जेरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – Video: ब्रेकअपनंतर टायगरची बहीण करतेय Chill!