घरमनोरंजन‘तुला पाहते रे’ विक्रांत या दिवशी करणार इशाला प्रपोज

‘तुला पाहते रे’ विक्रांत या दिवशी करणार इशाला प्रपोज

Subscribe

‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रांत इशाला केव्हा प्रपोज करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. मात्र आता लवकरच विक्रांत इशाला प्रपोज करणार आहे.

झी मराठीवरील नुकतीच सुरू झालेली मालिका म्हणजे, ‘तुला पाहते रे’. या मालिकेच्या वेगळ्या विषयामुळे आणि तगड्या स्टार कास्टमुळे अवघ्या काही दिवसातच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतून वय विसरायला लावणारे आगळेवेगळे प्रेम पाहायला मिळत आहे. या जोडीतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार ही वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. या अनोख्या जोडीलाही प्रेक्षकांनी लगेच स्विकारलं आहे. मालिकेच्या सुरूवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेवर केलेल्या प्रेमामुळे ही मालिका नंबर वन देखील ठरली आहे. विक्रांत आणि इशाची ही प्रेमकहाणी लवकरच पुढच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. मात्र आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे विक्रांत इशाला प्रपोज केव्हा करणार आहे. या विशेष भागासाठी मालिकेचे निर्माते तारीख ठरवत आहेत.

या दिवशी करणार प्रपोज

विक्रांत आणि इशाने बऱ्याच वेळा अप्रत्यक्षरित्या एकमेकांकडे प्रेम व्यक्त केलं आहे. पण आता विक्रांत प्रत्यक्षरित्या इशाला केव्हा प्रपोज करणार याकडे सर्व रसिक प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या ९ डिसेंबरला ‘तुला पाहते रे’ च्या प्रेक्षकांना विक्रांत इशाला प्रपोज करणार हा भाग दाखवण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.

- Advertisement -

प्रेमकहाणीत चढउतार

सध्या या मालिकेमध्ये विक्रांत आणि इशाच्या प्रेमकहाणीत बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. विक्रांतचा शत्रू जालिंदर याच्या एण्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. हा जालिंदर विक्रांतविरोधात इशाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता या अडचणीवर मात करत विक्रांत इशाचं मन कस जिंकणार हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.


संबंधित बातम्या –

वाचा – ‘तुला पाहते रे’ची सरशी

- Advertisement -

वाचा – सुबोध भावेच्या अभिनेत्रीची ‘ही’ स्टोरी तुम्हाला माहितीये का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -