‘लाव रे तो व्हिडिओ’ नंतर ‘तुला पाहते रे’ची क्रेझ

'लाव रे तो व्हिडिओ' नंतर 'तुला शोधते रे'ची क्रेझ वाढलेली दिसत आहे. सध्या गुगल ट्रेण्डवर राज ठाकरेंना देखील या मालिकेमे मागे टाकले आहे.

Mumbai
tula pahate re serial in google trends as against raj thackeray
'लाव रे तो व्हिडिओ' नंतर 'तुला शोधते रे'ची क्रेझ

झी मराठी वरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेला वेगवेगळी वळण सुद्धा आजवर आली. मात्र आता मालिका एक नवे वळण घेत आहे. या मालिकेने ‘लाव रे व्हिडिओ’, असा आदेश देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना देखील मागे टाकले आहे.

या राज्यांतही मालिकेला भरभरुन प्रतिसाद

‘तुला पाहते रे’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार ही वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळली. या जोडीवर आणि मालिकेतील अन्य कलाकारांवरही उभ्या महाराष्ट्राने भरभरुन प्रेम केले. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे काही दिवसांपूर्वीच ‘तुला पाहते रे‘ ही मालिका ‘टीआरपी’च्या स्पर्धेत नंबर वन ठरली आणि आता या मालिकेने राज ठाकरेंना देखील गुगल ट्रेंअमडसमध्ये मागे टाकले आहे. ही मालिका केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात यांसारख्या राज्यांतही लोकप्रिय आहे.

राजनंदिनीची एण्ट्री

‘तुला पाहते रे’मध्ये नुकतीच राजनंदिनीची एण्ट्री झाली आहे. मालिकेच्या टीझरमध्ये तिची झलक पाहायला मिळाली होती. पण आतापर्यंत मालिकेत तिची एण्ड्री झाली नव्हती. मालिकेत तिच्या येण्याने आणखीनच लोकप्रियता वाढली आहे.

नाईकांनाही सरंजामेंनी मागे टाकले

गूढ आणि थराराने परिपूर्ण अशा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र नाईकांनाही सरंजामेंनी मागे टाकले आहे. तर ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम देखील प्रेक्षकांना वेड लावत असला तरी देखील या धमाल कॉमेडी कार्यक्रमाला ‘तुला पाहते रे’ने मागे टाकले आहे.


वाचा – गुगल ट्रेण्डवर ‘राज’ सत्ता; पवार, फडणवीसांना टाकलं मागे


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here