‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादाच्या वडिलांना कोठडी

'पीएनजी ज्वेलर्स'ची फसवणूक केल्या प्रकरणी कोठडी

Mumbai

झी मराठी वाहिनावरील सुप्रसिद्ध असलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगाला’ याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मध्यंतरी या मालिकेतील मुख्य भूमिका करणारा राणादा म्हणजेच हार्दिक जोशी मालिकातून बाहेर जाण्याची चर्चा चालू होती. तसेच काही दिवसांपूर्वी अजून एक धक्कादायक बातमी समोर आली की, राणादादाचे मालिकेतील वडील मंत्री प्रतापराव गायकवाड अर्थात मिलिंद दस्ताने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता त्यांना आणि त्यांच्या पत्नीला २१ जूनपर्यंत कोर्टाने कोठडी सुनावली आहे.

अभिनेते मिलिंद दस्ताने आणि त्यांची पत्नी सायली दस्ताने या दोघांनी ‘पीएनजी ज्वेलर्स’ची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्यामुळे मंगळवारी चतुःश्रृंगी पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

‘पीएनजी ज्वेलर्स’च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ यांनी फसवणूक केल्यासंदर्भात मिलिंद दस्ताने आणि त्यांच्या पत्नीविरोधात तक्रार केली होती. औंध भागातील गाडगीळ यांच्या ‘पीएनजी ज्वेलर्स’मधून २५ लाख ६९ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, सोन्याची बिस्किट, हिरेजडीत अंगठी अशा वस्तू दस्ताने आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी खरेदी केल्या. मिलिंद दस्ताने यांनी त्यावेळी डोंबिवली भागातील जमिनीची विक्री केल्यानंतर उधारीवर घेतलेल्या दागिन्यांची रक्कम परत करेल, असे गाडगीळ यांना सांगितले होते. पण घेतलेल्या दागिन्यांचे पैस देण्यास टाळाटाळ केली. म्हणून अक्षय गाडगीळ यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नमूद केली होती.