Cannes 2019: अभिनेत्री हिना खान प्रियकरासह पोहोचली फ्रान्सला; शेअर केले फोटो!

फान्समध्ये पोहचताच हिनाने इंस्टाग्रामवर पॅरिसच्या आयफिल टॉवरचे फोटो शेअर केले

Mumbai

प्रतिष्ठेचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिव्हल सोहळ्यास नुकतीच सुरूवात झाली.यातील पदार्पणापुर्वीच टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान आपला प्रियकर रॉकी जयस्वाल सोबत पॅरिसच्या आयफिल टॉवर येथे दोघांनी एकमेकांसह खास वेळ घालवला. याचे काही फोटो हिनाने इंस्टाग्रामवर पॅरिसच्या आयफिल टॉवरचे फोटो शेअर केले आहेत.

हिना खान ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये आपल्या पदार्पणाबद्दल खूपच उत्साहात दिसत आहे. कसोटी जिंदगी के २ आणि बिग बॉस ११ ची स्पर्धक होती. मागील काही काळापासून हिना तिच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या पदार्पणाबद्दल चर्चेत आली होती. शेवटी हिना फ्रान्समध्ये पोहचताच तिचे स्वप्न पुर्ण झाल्याची बातमी तिने आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

#JustBe…Restoring my energy.. Before it begins 🙏

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

यावेळी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना या फोटोला ‘Restoring my energy.. Before it begins’असे कॅप्शन देत चाहत्यांसह आनंद शेअर केला आहे.

१४ मे पासून २५ मे पर्यंत सुरू असणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड विश्वातील बरेच कलाकार सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण, सोनम कपूर, कंगना रनौत, हुमा कुरैशीचे नावं सहभागी असून हिना खानचे नाव यंदा या अभिनेत्रींच्या यादीत घेतले जात आहे.