Video: चिमुरड्यांमुळे सिद्धार्थ-रश्मीत पुन्हा दोस्ती

tv bigg boss 13 family week rashmi desai brother kids in bb house rashmi siddharth shukla friendship
Video: चिमुरड्यांमुळे सिद्धार्थ-रश्मीत पुन्हा दोस्ती

हिंदी टीव्ही मालिकांमध्ये ‘बिग बॉस १३’ हे टीआरपीच्या स्पर्धेत नंबर एकला आहे. सध्या ‘बिग बॉस १३’ मध्ये फॅमिली वीक सुरू असून सर्व सदस्य भावनिक होताना दिसत आहेत. या फॅमिली वीकमध्ये बिस बॉसमधील सदस्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य भेटायला येत असतात. या फॅमिली वीक मधला सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाचा आहे. या व्हिडिओत रश्मीला दोन गोंडस मुलं भेटायला आलेली दिसतं आहेत. या दोन मुलांनी रश्मीला असं काहीतरी सांगितलं की ज्यामुळे सिद्धार्थ शुक्ला देखील भावनिक झाला.

फॅमिली वीक दरम्यान रश्मी देसाईला आई किंवा भाऊ भेटायला येईल अशी शक्यता असते. मात्र या दोघांपैकी कोणीही न येता भाऊ बुलंद देसाई याची मुलं तिला भेटायला येतात. स्वातिक आणि भव्या असं या दोघांचं नावं आहे. हे दोघं रश्मीचा जीव आहेत. ४ महिन्यानंतर त्यांना भेटल्यामुळे रश्मी खूप भावूक झाली. ही दोन मुलं रश्मीला सोनू असा आवाज देत बिग बॉसच्या घरात आले.

सिद्धार्थ सोबत मैत्री का तोडली? असा प्रश्न या दोघांनी रश्मीला विचारला. तसंच या दोघांनी रश्मीला सिद्धार्थसोबत पुन्हा मैत्री करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रश्मी आणि सिद्धार्थ यांनी पुन्हा मैत्री करून स्वातिक आणि भव्यासोबत खूप मस्ती केली. त्यानंतर ही दोन मुलं घराबाहेर गेल्यानंतर सिद्धार्थ रश्मीची काळजी घेताना दिसला. या दोन मुलांमुळे सिद्धार्थ आणि रश्मीमधल्या दुरावा कमी झाला आहे. या दोघांच्या नात्याला वेगळं वळणं आलं आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस १३’ मध्ये सिद्धार्थ आणि रश्मीची मैत्री पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – फ्रिजपेक्षा जास्त थंड आहे राखीचा हिरो; पाहा व्हायरल व्हिडिओ