‘या’ कारणामुळे झाली रमादानदरम्यान शमा सिकंदर ट्रोल

shama sikander
शमा सिकंदर (सौजन्य - इन्स्टाग्राम)

विक्रम भटच्या ‘माया’ वेबसिरीजमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या हॉटनेसने शमा सिकंदरने भुरळ पाडली. मात्र शमा आता परत एका कारणामुळे चर्चेत आली आहे. रमादानमध्ये बिकनी घालून हॉट शूट केल्यामुळे शमाला नेटिझन्सकडून ट्रोल केले जात आहे. शमाने आपल्या इन्स्टाग्रामवर पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या बिकिनीमधील एक हॉट फोटो पोस्ट केला आहे.

रमजानमध्ये हॉट फोटो शूट
सध्या रमजानचा कालावधी चालू आहे. या दरम्यान हिना खाननंतर आता नेटिझन्सने शमा सिकंदरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. शमाने आपल्या इन्स्टाग्रामवरून बिकनी शूट करून हॉट फोटो पोस्ट केले आहेत. शमाचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहानसहान गोष्टी ती इन्स्टावर पोस्ट करत असते. मात्र यावेळी तिला तिच्या शूटसाठी ट्रोल करण्यात आले आहे. शमाने याआधी जेव्हा जेव्हा असे फोटो पोस्ट केले आहेत, तेव्हा ते फार कमी वेळामध्ये व्हायरल झाले आहेत.

जरा तरी लाज बाळग…नेटिझन्स
मुस्लीम धर्मात रमजान हा पवित्र महिना मानला जातो. अशावेळी अशा तऱ्हेचे कपडे अर्थात बिकिनी घालून अभिनेत्रींनी फोटो पोस्ट करणे वाईट समजले जाते. या अभिनेत्री त्यांची मर्यादा ओलांडत आहेत अशा तऱ्हेच्या चर्चांना उधाण आले आहे. केवळ लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी या अभिनेत्री असे करतात असे म्हटले जात आहे.
या तिच्या फोटोला बऱ्याच जणांनी लाईक केले असून काही जणांनी तिला थोडी तरी लाज बाळगण्याचा सल्ला दिला आहे. निदान रमजानच्या पवित्र महिन्यात तरी आपल्या धर्माची लाज राखावी असेही काही नेटिझन्सनी शमाला सांगितलं आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here