कळली का गूड न्यूज?

mumbai
lagir zal jee
लागीर झालं जी

मालिका असो किंवा चित्रपट कलाकारांना खूप कमी वेळ स्वत:साठी मिळतो. त्यात ते जर डेलिसोप करत असतील, मुख्य भुमिकेत असतील तर सुट्टी मिळणही कठीण जातं. मात्र मालिकेच्या सेटवर त्यांच स्वत:च एक कुटूंब तयार झालेलं असतं, आणि तेच कुटूंब कलाकारांच्या प्रत्येक सुख- दुख:त त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतं. याचाच अनुभवर लागीर झालं जी या झी मराठीवरील मालिकेच्या सेटवर सगळ्यांच्या लाडक्या शितलीला म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरला आला. त्याचप्रमाणे  प्रेक्षकांना येत्या काही भागांमध्ये मालिकेमध्ये वेगवेगळ्या घटना बघायला मिळणार आहेत. लवकरच मालिका एक वेगळं वळण घेणार आहे.

 

View this post on Instagram

 

OH MY GOD! I could not believe the love and the excitement I experienced on my birthday this time. It was the loveliest birthday ever. I’m so lucky to be a part of #LagiraJhalaJi. The cutest friends, the bestest crew, the loveliest fans and my dearest family made my day! From the surprise cake cutting party on the terrace, the family time I spent with my parents and my sister, fans coming all the way from Nashik, Aurangabad, Gujarat just to wish, to the cake cutting sessions on the set, the overflowing wishes on Facebook, Instagram, WhatsApp, everything was just magical. I can’t be more than grateful to the people God has sent to me in life. Really lucky to have you guys. Just in case you missed the insights, the photos and videos from yesterday are uploaded as story highlights on my page. Thanks for making my 25th sooooo special ❤️? Photo credits: Sissy Missy

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on

 शिवानीचा नुकताच वाढदिवस झाला. शिवानीला वाढदिवसा दिवशी मुंबईला येणं शक्य नव्हतं. पण शिवानीच्या सहकलाकारांनी तिला खास सरप्राईझ यावेळी दिलं. मालिकेतील यास्मिन आणि शिवानीची हेअरड्रेसर यांनी रात्री बारा वाजता तिला बिल्डिंगच्या टेरेसवर नेलं. यावेळी टेरेसवर मालिकेची संपूर्ण कास्ट आणि क्रू शितलची वाट बघत टेरेसवर होते. संपूर्ण टेरेसला फुग्यांनी सजवलं होतं, आणि शिवानीसाठी खास छोट्याश्या पार्टीच आयोजन केलं होतं. शिवानीने संपूर्ण क्रूबरोबर केक कापला आणि आपला वाढदिवस साजरा केला.

आई बांबाची खास भेट

शिवानीच्या वाढदिवसानिमित्त शिवानीचे आई-वडिल खास तीला भेटालया मुंबईवरून साताऱ्याला गेले. शिवानीसाठी आई बाबा साताऱ्याला येण हे खास गिफ्ट होतं. शिवानीने महावळेश्वरला जाऊन आई बाबांबरोबर वेळ घालवला.

 “वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यास मिळावं यासारखा दुसरा आनंदजगात नाही. त्यांच्याशिवाय वाढदिवसाचं आनंद अपूर्ण आहे. मी माझ्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला तसंच लागीरं झालं जीच्या माझ्या या कुटुंबाने देखील मला खूप मोठं सरप्राईज दिलंआणि हा विढदिवस मी कधीच विसरू शकत नाही.” – शिवानी बावकर, अभिनेत्री

 

 

View this post on Instagram

 

कळली का गूड न्यूज? ??❤️

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on

 शितली होणार आई

मालिका लवकरच वेगळं वळण घेणार आहे. लवकरच शितली आई होणार आहे. आता शितलीची ही बातमी ऐकून घरात सगळ्यांच्या काय प्रतिक्रीया असणार. मामी आता तरी शितलीशी चांगलं वागणार का? आपण बाप होणार म्हटल्यावर अजिंक्य पुन्हा बॉर्डवर जाणार का? हे तुम्हाला मालिकेच्या येत्या काही भागांमध्ये समजणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here