#BoycottDabangg3; …म्हणून ‘दबंग ३’च्या ‘त्या’ गाण्यावर नेटकरी भडकले!

'दबंग ३' चित्रपटातील गाणं 'में हु दबंग' यावर अनेक नेटकऱ्यांनी आक्षेप केला आहे. हिंदू धर्मातील लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं हे गाणं आहे असं ते म्हणतात.

Mumbai
#BoycottDabangg3; दबंग ३ वर बहिष्कार टाकण्यास नेटकरी उठले
#BoycottDabangg3; दबंग ३ वर बहिष्कार टाकण्यास नेटकरी उठले

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं नाव अनेकदा वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत  येतं. सलमानच्या ‘दबंग ३’ची घोषणा झाल्यापासूनच सतत या ना त्या कारणाने चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आलेला आहे. शुक्रवारी सकाळपासून ट्विटरवर #BoycottDabangg3 म्हणजे दबंग ३ वर बहिष्कार टाका असा ट्रेंड सुरू आहे. याच कारण म्हणजे चित्रपटातील गाणं ‘में हु दबंग’ मध्ये सलमानच्या एन्ट्री दरम्यान त्याच्या मागे काही साधू दिसतात. तर या साधूंच्या हातात गिटार असून एखाद्या रॉक कॉंन्सर्टमध्ये असल्यासारखं आपलं डोकं आपाटताना ते दिसत आहेत आणि गाण्यात पुढे ते नृत्य देखील करताना दिसतात. गाण्याच्या एका भागात शंकर, कृष्ण आणि राम हे तीन देव सलमानला आर्शीवाद देताना ही दिसत आहे. तर ही गोष्ट हिंदूंच्या भावना दुखवणारी आहे असं अनेक लोकांचं म्हणणं आहे.

 

अनेक नेटकऱ्यांनी या गाण्यावर बहिष्कार का टाकायचा या संबंधी ट्वीट केले आहेत. तर हिंदू जागृती समितीनं सेन्सर बॉर्डला या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी केली आहे.

 

एकीकडे काही नेटकरी दबंग ३ वर बहिष्कार टाकण्याची चर्चा करत आहेत तर एकीकडे सलमानच्या चाहत्यांनी #AwaitingDabanng3 म्हणजे दबंग ३ साठी आतुरतेनं वाट पाहत आहोत असं ट्रेंड सुरू केलं.

दबंगच्या चित्रपटांची खासियत म्हणजे त्यातील आयटम सॉग. पहिल्या दोन चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ आणि ‘फेविकोल से’ ही गाणी फार प्रसिध्द झाली होती. तर आता दबंगच्या तिसऱ्या भागात मुन्ना नाही तर मुन्ना बदनाम होणार आहे. चित्रपटातील आयटम सॉंग ‘मुन्ना बदनाम हुआ’ चा टीजर सलमाननं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे. या गाण्यात सलमानसह वरीना हुसैन दिसणार आहे.

या चित्रपटात सलमान खानसह, सोनाक्षी सिंह, अरबाज खान आणि अनेक कलाकार दिसणार आहेत. त्या बरोबरच अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये प्रवेश घेणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी पाहता येईल.


 

हेही वाचा: ‘द फॅमिली मॅन’ २ चा टीझर प्रदर्शित, ‘ही’ तमीळ अभिनेत्री करणार डेब्यू!