देसी गर्ल प्रियांकाचा युनिसेफ करणार सन्मान

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राला युनिसेफतर्फे पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

New Delhi
Priyanka Chopra
अभिनेत्री प्रियांका चोप्रा

वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. युनिसेफची गुडविल अॅम्बेसेडर असलेल्या प्रियांका चोप्राला सन्मानित करण्याचा निर्णय युनिसेफने घेतला आहे. त्यानुसार भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राला युनिसेफकडून ‘डॅनी केये ह्यूमनटेरियन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत खुद्द प्रियांकाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ३ डिसेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये आयोजित युनिसेफच्या ‘स्नोफ्लेक बॉल’ सोहळ्यात प्रियांकाचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रियांकाने ट्वीट मध्ये म्हटले आहे की, युनिसेफसाठी त्यांचं काम अतिशय महत्त्वाचे आहे. युनिसेफसह जगातील मुलांसाठी मी करत असलेले काम माझ्यासाठी सर्वकाही आहे. जगातील सर्वच मुलांना शांती, स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार असल्याचेही प्रियांकाने म्हटले आहे.

२००६ पासून प्रियांका युनिसेफबरोबर जोडली गेली आहे. २०१० आणि २०१६ या वर्षांमध्ये प्रियांकाला बाल हक्कांसाठी राष्ट्रीय, जागतिक युनिसेफ गुडविल अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते.