घरमनोरंजनअमरापूरकर कुटुंबियांचा पुरुषोत्तम

अमरापूरकर कुटुंबियांचा पुरुषोत्तम

Subscribe

हिंदी, मराठी चित्रपटामध्ये ज्या कलाकारांनी स्वत:चे असे प्रस्त निर्माण केले होते, त्यात सदाशिव अमरापूरकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. व्यावसायिकदृष्ठ्या अमरापूरकर चित्रपटामध्ये गुंतले असले तरी रंगभूमीवरची निष्ठा त्यांनी फारशी कमी होऊ दिली नव्हती. व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही कलाप्रकारांसाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. पुढे स्वत:च्या जबाबदारीत काही चित्रपटांची निर्मिती केली. रिमा या त्यांच्या कन्येला दिग्दर्शिका म्हणून त्यांनी प्रथम चित्रपटसृष्टीत आणले होते. ‘आर आर आबा आता तरी थांबा’ हे त्या चित्रपटाचे नाव आहे. आता अमरापूरकर हे आपल्यात काही राहिलेले नाहीत त्यामुळे दिग्दर्शन, निर्मिती प्रक्रिया थांबेल असे वाटले होते, पण अमरापूरकर यांची पत्नी सुनंदा, दुसरी कन्या केतकी यांनी काही जबाबदार्‍या स्वीकारून ‘पुरुषोत्तम’ या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. केतकीने यात मुख्य भूमिका निभावली असून, रिमाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. अर्थात याची प्रस्तूती आई सुनंदा यांनी केलेली आहे. केतकीबरोबर नंदू माधव, किशोर कदम, देविका दफ्तरदार, पूजा पवार या कसलेल्या कलाकारांचा सहभाग या चित्रपटात आहे. पुढल्या महिन्यातल्या अमरापूरकर यांच्या जन्मदिवसाचे निमित्त घेऊन हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. सामाजिक जाणिवेने भारावलेल्या एका अधिकार्‍याची ही गोष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -