VIDEO : ‘डार्लिंग’ तू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तरुणाईला थिरकायला लावणारं ‘डार्लिंग तू’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. ही चर्चा म्हणजे अभिनेता निखील चव्हाण आणि त्याच्या डार्लिंगची. निखील याच्या आयुष्यात कोण डार्लिंग येणार असा त्याच्या चाहत्यांना प्रश्न देखील पडला होता. त्यामुळे अनेक चर्चांना उढाण आले होते. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण निखीलची डार्लिंग दुसरी-तिसरी कोणी नसून त्याचा आगामी चित्रपट असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात निखील मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतेच या चित्रपटातले ‘डार्लिंग तू’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

तरुणाईला थिरकायला लावणारे गाणं

सध्या सोशल मीडियावर ‘डार्लिंग तू’ हे गाणं चांगलेच गाजत असून हे गाणं ऐकल्यानंतर तरुणाईचे पाय थिरकायला लागतील. हे गाणं निखील आणि अभिनेत्री रितीका श्रोत्री यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. यासोबतच अभिनेता प्रथमेश परब देखील यात झळकला असून समीर आशा पाटील दिग्दर्शित डार्लिंगमधील हे गाणं महेश खोमणे यांनी गायलं असून महेश-चिनार यांनी संगीत दिलं आहे.

‘डार्लिंग’च्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘यंटम’ आणि ‘वाघेऱ्या’ या सिनेमांचं दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरणार आहेत. हा चित्रपट येत्या ७ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! यशराजचे चित्रपट पाहा फक्त ५० रुपयांत!