उरीच्या यशचा फायदा ‘असा’ झाला विकी कौशलला

अभिनेता विकी कौशल लोकप्रियतेच्या प्रकाश झोतात आला. पण 2019मधल्या उरी चित्रपटाने तर कमालच केली. विकी कौशल रातोरात स्टार झाला.

Mumbai
vickey Koushal
विकी कौशल

विकी कौशलच्या ‘हाउज दि जोश’ ह्या डायलॉगमूळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही त्याच्या फॅनफॉलोविंग मध्येही जोश दिसून येतोय. 2018 मध्ये संजू, मनमर्जिया आणि राजी फिल्म्सच्या यशामुळे अभिनेता विकी कौशल लोकप्रियतेच्या प्रकाश झोतात आला. पण 2019मधल्या उरी चित्रपटाने तर कमालच केली. विकी कौशल रातोरात स्टार झाला.

‘उरी- सर्जिकल स्ट्राईक’ हा 11 जनवरीला चित्रपट प्रदर्शित झाला. उरीने संपूर्ण महिनाभर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. याचा अर्थातच फायदा विकीच्या लोकप्रियतेत झाला. 2019च्या सुरूवातीला लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत 34 व्या स्थानी असलेला विकी आता 6 व्या स्थानावर पोहोचलाय. स्कोर टेंड्स इंडियाच्या गेल्या 45 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते की, 3 जानेवारी 2019ला विकी कौशल 34व्या स्थानावर होता. तर उरी चित्रपटाच्या रिलीजच्या आठवड्यात म्हणजेच 10 जानेवरी ते 17 जानेवारीच्या आठवड्यात पांचव्या स्थानावर पोहोचला होता. ज्यानंतर त्याच्या  लोकप्रियतेत बरेच उतार-चढाव दिसले. त्यानंतर पून्हा 14 फेब्रुवारीच्या आठवड्यात उरी सिनेमाला मिळालेल्या बॉक्स ऑफिस रिस्पॉन्समूळे विकी लोकप्रियतेत 6 व्या स्थानावर आला.

“विकीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या उरी फिल्ममूळे त्याच्या यशात आणि चाहत्यांच्या प्रेमात एवढी वाढ झाली की, त्याच्याविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, डिजीटल न्यूज आणि प्रिंट न्यूजमध्ये खूप लिहीलं आणि चर्चिलं जातं होतं. गेल्या वर्षी आलेल्या सिनेमांमूळे विकी कौशल एक चांगला अभिनेता आहे, हे सिध्द झालंच होतं. पण 2019 वर्षाने विकीला स्टारपण बहाल केलं, असं म्हणावं लागेल. आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. “

– अश्वनी कौल, स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here