उर्मिला अभिनेत्री नाही सॉफ्ट पॉर्नस्टार, कंगना बरळली!

kangana ranaut-urmila-matondkar
कंगना- उर्मिला

अभिनेत्री कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर यांच्या चांगलच ट्विटर वॉर रंगलं आहे. मात्र उर्मिला मातोंडकर यांची मनोरंजन विश्वातून पाठराखण केली जात आहे. उर्मिलावर टीका करताना कंगनाची जीभ घसरली. उर्मिला अभिनयासाठी ओळखली जात नाही, ती ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’ असल्याची अशी खालच्या पातळीची टीका कंगनाने केली होती.

कंगना उर्मिलावर टीका करताना म्हणाली,’ उर्मिला मातोंडकर…ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परीचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी..बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार? असं कंगना टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.

काय म्हणालेल्या उर्मिला मातोंडकर?

संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचलप्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान आहे. तीला त्याची कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे” अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केली होती. पुढे बोलताना त्या म्हणालेल्या, क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है, अशी भाषा कोणती संस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण तिला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्याच पैशातून आहे. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.

नावे जाहीर करावीत….

“नावे कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने प्रत्यक्षात पुढे यावे आणि त्या सर्वांचे नाव घेऊन इंडस्ट्रीला मदत करावी. चला त्यांची सफाई करुया. मी तुला थंब्ज अप देणारी पहिली व्यक्ती असेन मुली” असेही त्या म्हणाल्या होत्या.


हे ही वाचा – दोन मिनिटांच्या रोलसाठीही हिरोसोबत शय्यासोबत करावी लागते -कंगना रानौत