Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन चर्चा तर होणारचं, उर्वशी रौतेलाची बॅकलेस ड्रेसमधील अदा

चर्चा तर होणारचं, उर्वशी रौतेलाची बॅकलेस ड्रेसमधील अदा

उर्वशी रौतेला तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच युनिक हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. उर्वशीच्या एकूणच सकारात्मक व्यक्तीमत्वमुळे फॅशनेबल ड्रेसमध्ये ती अगदी उठून दिसते. सोशल मिडियावरही ती बरीच सक्रिय असते. वेगवेगळ्या अंदाजातील क्लिन बोल्ड फोटो नेहमी शेअर करत असते. सोशल मिडियावरीलही चाहता वर्ग तिच्या सौदर्याला आणि बोल्डनेसपणाला अधिक पसंत करत असतो. आताही उर्वशी रौतेला एका हटके स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या एका पार्टीत उर्वशी रौतेलाने हजेरी लावली होती. या पार्टीत ती केवळ 15 मिनिटांसाठी हजर होती. यासाठी उर्वशी रौतेलाला चार कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. त्याहून थक्क करणारी बाब म्हणजे या पार्टीत उर्वशी रौतेलाने परिधान केलेला ड्रेस.

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाच्या या ड्रेसची प्रचंड चर्चा रंगली आहे. उर्वशीने इन्स्टाग्रामवर या गाऊनमधील काही फोटो शेअर केले होते. लाल रंगाच्या या बॅकलेस गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचे सौदर्यं अधिक खुलून आले आहे. मायकल सिनको या डिझायनरने उर्वशीचा हा ड्रेस डिझाईन केला होता. हा गाऊन तयार करण्यासाठी तब्बल 150 तास लागले. तर या गाऊनची किंमत 32 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

उर्वशीने इंस्टाग्राम या ड्रेसमधील फोटो शेअर करत लिहिले आहे की, जेव्हा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला अंतर मनातून वाहणाऱ्या नदीप्रमाणे आनंद मिळत असतो. पूर्वीही उर्वशी रौतेला तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी गायिका नेहा कक्कड हिच्या लग्नात उर्वशीने परिधान केलेला लेहंगाही चर्चेचा विषय ठरला होता. यासाठी चाहत्यांनी तिचे बरेच कौतुकही केले होते. उर्वशीने अनिल कपूर यांच्या सिंह साब द ग्रेट या चित्रपटातून आपल्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, सनम रे, भाग जॉनी, हेट स्टोरी ४ चित्रपटांमध्ये झळकली. नुकतेच ती ‘ चांद कहां से लाओगी’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

 


हेही वाचा- आणि अमृता फडणवीसांच ते गाणं आलंच…


 

- Advertisement -