घरमनोरंजन'साऊथ एशिअन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'ही' मराठी अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

‘साऊथ एशिअन फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘ही’ मराठी अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

Subscribe

'माई घाट: क्राईम नं १०३/२००५' (Mai Ghat) या सिनेमासाठी एनवायसी दक्षिण आशियाई फिल्म फेस्टिवल(न्यूयॉर्क)(New Yrok) येथे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ जिंकला आहे.

आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी आणि बॉलीवूडमध्ये लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री उषा जाधव हिच्या मुकूटात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती (Naional Award Winner) अभिनेत्री उषा जाधव (Usha Jadhav) हिने ‘माई घाट: क्राईम नं १०३/२००५’ (Mai Ghat) या सिनेमासाठी एनवायसी दक्षिण आशियाई फिल्म फेस्टिवल(न्यूयॉर्क)(New Yrok) येथे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ जिंकला आहे.

- Advertisement -

‘माई घाट’ – आईच्या संघर्षाची कहाणी

अभिनेत्री उषा जाधव हिचा ‘माई घाट’ या बायोपिक सिनेमामधील अभिनय वाखाणण्याजोगा आहे. ‘माई घाट’ या बायोपिक सिनेमामध्ये एका आईच्या एकुलत्या एक मुलाला पोलिसांकडून छळ करून ठार मारले जाते. आपल्या मुलाच्या मृत्युनंतर त्याला न्याय मिळावा याकरता अनेक दशकांहून अधिक काळ या आईने केलेल्या संघर्षाची ही खरी कहाणी आहे. अनंत महादेवन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून मोहिनी गुप्ता या त्याच्या निर्माता आहेत.

- Advertisement -

उषा जाधवच्या मेहनतीचे यश

मधुर भंडारकर यांच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’ या सिनेमातून उषाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तर २०१२ मध्ये ‘धग’ या मराठी सिनेमातील अभिनयामुळे उषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अपार कष्ट आणि मेहनतीने यशाची शिखरे गाठून उषाने मराठी मनाचे नाव उंचावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -