‘तान्हाजी’ महाराष्ट्रात टॅक्स फ्रीच्या प्रेक्षक प्रतिक्षेत!

Mumbai

अजय देवगणचा ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सध्या प्रचंड गर्दीत सुरू आहे. अनेक राज्यात तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. तान्हाजी चित्रपटाला टॅक्स फ्री केलं जावं अशी मागणी फार आधीपासूनच सुरु होती. उत्तर प्रदेशात ही मागणी मान्य करण्यात आली असून चित्रपट टॅक्स फ्री केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही चित्रपट टॅक्स फ्री केला जावा अशी मागणी होत आहे. चित्रपटात अजय देवगणसह सैफअली खान आणि काजोल मुख्य भुमिकेत आहेत.

चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणने चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती केली होती. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारकडून निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. ट्विटरवरून अजयने आभार मानले आहेत.“उत्तर प्रदेशात चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल योगी आदित्यनाथजी तुमचे आभार. हा चित्रपट तुम्ही पाहिलात तर मला अजून आनंद होईल”.असे ट्विट अजयने केले आहे.

उत्तर प्रदेशात तान्हाजी टॅक्स फ्री झाल्यानतर आता महाराष्ट्रात तान्हाजी टॅक्स फ्री करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here