घरमनोरंजनवामन भोसले आणि परेश रावलांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार

वामन भोसले आणि परेश रावलांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार

Subscribe

राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिध्द अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिध्द अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे. तसेच राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले आणि सुप्रसिध्द अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे. तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार ५ लक्ष रुपयाचा तर विशेष योगदान पुरस्कार ३ लक्ष रुपयाचा आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या मान्यवरांची सन २०१९ च्या पुरस्कारांसाठी निवड केली आहे.

- Advertisement -

५६ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार पुरस्कारांचे वितरण

सुषमा शिरोमणी यांनी सन १९८५ साली बालकलाकार म्हणून सोने की चिडीया, लाजवंती या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं.  सन १९६९ साली सतीचे वाण या चित्रपटात सहनायिका म्हणून तसेच दाम करी काम या चित्रपटात मुख्य नायिका साकारली. भरत जाधव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन १९८५ मध्ये शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा मधून केली. वामन भोसले यांचे बालपण गोव्यातील पामबुरपा या छोटया गावात गेले आणि तेथे शिक्षण घेऊन सन १९५२ मध्ये ते  मुंबईमध्ये आले. बॉम्बे टॉकीज या त्या काळातील एका प्रतिष्ठित चित्रपट निर्मिती संस्थेत संकलक डी.एन.पै यांच्याकडे आपण उमेदवारी सुरु केली. नवीन गोष्टी शिकण्याच्या स्वभावानुसार त्यांची ओळख गुरुदास शिराली यांच्याशी झाली.  १९६९ मध्ये दिग्दर्शक राज खोसला यांनी राजेश खन्ना व मुमताज यांची भूमिका असलेल्या दो रास्ते या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सोपवली व त्यांनी  या चित्रपटाला उत्तम न्याय दिला. तर परेश रावल यांचे बालपण विलेपार्ले येथील आहे.  ते दहा -अकरा वर्षाचे असताना कुतूहल म्हणून नवीनभाई ठक्कर ओपन थिएटर मध्ये जाऊ लागले, तेथूनच त्यांना गुजराती नाटकाची आवड लागली. श्री रावल यांनी चित्रपट, रंगभूमी व दूरदर्शन या तीनही माध्यमातून भूमिका साकारली आहे.  हिंदी चित्रपटातून भूमिका साकारताना ते कधीच स्टारडमच्या आहारी गेले नाहीत. हेरा फेरी, हंगामा, अंदाज अपना अपना, चाची ४२०, फिर हेरा फेरी या चित्रपटातून त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारली आहे. २०१४ साली त्यांना भारत सरकारच्या वतीने पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने यंदा ५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथे  दि. २६ मे २०१९ रोजी सायं.६.३० वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळयाप्रसंगी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -