म्हणून व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने केली महेश बाबूंची प्रशंसा

व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने अभिनेते महेश बाबूंच्या 'महर्षी' चित्रपटाची प्रशंसा केली आहे.

Mumbai
v v s laxman
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

माजी क्रिकेटपटू आणि भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने अभिनेते महेश बाबूंच्या ‘महर्षी’ चित्रपटाची प्रशंसा केली आहे. ‘महर्षी’ चित्रपटाबाबत आपल्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त करिताना लक्ष्मण म्हणाला, ‘महर्षी चित्रपटाने महत्वाचा आणि प्रेरणादायी संदेश पोहचविला आहे आणि तो आपणा सर्वांसाठी महत्वाचा आहे. दमदार भूमिकेबद्दल महेश बाबुंचे अभिनंदन.’ व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी व्यक्त केलेल्या व्हेरी व्हेरी स्पेशल अभिप्रायावर अभिनेते महेश बाबूंनी सुद्धा लक्ष्मण यांचे ट्विटरवर आभार मानले.

‘महर्षी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

शेतकरी आणि शेतीच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारा महेश बाबूंचा ‘ महर्षी ‘ ९ मे रोजी प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे महर्षी महेश बाबूंचा हा २५ वा सिनेमा असून वमसी पैडीपल्ली दिग्दर्शित या चित्रपटास समिक्षक तसेच प्रेक्षकांकडून भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटात पूजा हेगडे, जयसुधा, अल्लुरी नरेश आणि जगपती बाबू यांची मुख्य भूमिका आहे.


हेही वाचा – ‘कारगिल विजय दिना’निमित्ताने ‘उरी’ चित्रपट पहा मोफत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here