Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी वरुण, साराचा 'कुली नंबर १' ख्रिसमसच्या दिवशी करणार धमाका

वरुण, साराचा ‘कुली नंबर १’ ख्रिसमसच्या दिवशी करणार धमाका

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खानचा चित्रपट ‘कुली नंबर १’ २५ डिसेंबरला Amazon प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. आता लवकरच या चित्रपटचा ट्रेलर येणार आहे.  Amazon प्राईम आणि वरुण धवन याने नव्या पोस्टरसह ट्रेलर प्रदर्शित होण्याची तारिख जाहीर केली आहे.

- Advertisement -

Amazon प्राईमने ‘कुली नंबर १’चा ट्रेलर केव्हा आणि कधी प्रदर्शित होणार याबाबत सांगितले आहे. २८ नोव्हेंबरला १२ वाजता ‘कुली नंबर १’चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ‘कुली नंबर १’चा या चित्रपटाचे दिग्दर्शन  डेविड धवन यांनी केली आहे. १९९५ साली आलेल्या गोविंदाचा ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा रिमेक हा रिमेक असणार आहे. गोविंदासोबत ‘कुली नंबर १’ चित्रपटात करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. आता वरुण धवन सोबत सारा अली खान दिसणार आहे. वाशु भगनानी ‘कुली नंबर १’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

डेविड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणारी वरुण धवनाचा हा तिसरा चित्रपट आहे. वरुण पहिल्यांदा डेविड धवन यांच्या ‘तू मेरा हिरा’ चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ‘जुडवा २’ या चित्रपटात काम केले होते. आता वरुण धवन ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – ब्रेकअपनंतर आमिरची मुलगी पुन्हा प्रेमात, फिटनेस कोचलाच करतेय डेट


 

- Advertisement -