वरून धवनने शेअर केला भाची सोबत केलेल्या ‘या’ डान्सचा व्हिडिओ

सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे वरून पुन्हा एकदा चर्चेत...

mumbai

अभिनेता वरून धवन नुकताच ‘कुली नं १’ या चित्रपटाचा शुटिंग संपवून पुन्हा मुंबईत परतला आहे. वरून त्याच्या गर्लफेंड नताशा दलाल सोबत रिलेशनशीपमध्ये असण्याच्या चर्च्याना गेल्या काही दिवस उधाण आले होते. मात्र आता वरून वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

मुंबईमध्ये ‘कुली नं १’ या चित्रपटाचा शुटिंग संपवून आल्यानंतर वरून आपल्या परिवारासह त्याचा वेळ घालवत आहे. सध्या सोशल मीडियावर वरूनने त्याच्या भाची सोबत केलेला जबरदस्त डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वरूनने त्याच्या भाचीला आपल्या खांद्यावर बसवल्याचे दिसत असून मज्जा-मस्ती करत डान्स करताना तो दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर केल्यावर अनेकांनी त्याला पसंती दिली असून अर्जून कपूरने देखील या व्हिडिओवर ‘ही पण पदार्पण करणार आहे का? तू तर चाचू नं १ बनला आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here