साराच्या वाढदिवसानिमित्त डेविड धवनची चाहत्यांना ‘ही’ भेट

'कुली नंबर १'चा रिमेक १ मे २०२० रोजी होणार प्रदर्शित

Mumbai

दिग्दर्शक डेविड धवनने अभिनेत्री सारा अली खानच्या वाढदिवसानिमित्त तिला आणि चाहत्यांना विशेष भेट दिली आहे. ही भेट वस्तू स्वरूपात नसून सारा आणि वरून यांचा येणारा कुली नंबर १ या चित्रपटाचे एक नवं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

कुली नंबर १ या चित्रपटाचा टीझर रविवारी प्रदर्शित करण्यात आले होते, मात्र आज सारा अली खानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाचे दुसरं पोस्टर रिलीज केले आहे. ज्यामध्ये सारा आणि वरूण धवन एकत्र पाहायला मिळत आहे.

धवनने आपल्या ट्विटरवर अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केले आहे. हा फोटो शेअर करताना वरूणने ”सारा तेरा बर्थडे आया, बर्थडे के दिन मैं तेरे लिए पोस्टर लाया.” , असे लिहीले आहे.

यासोबतच वरूण दिसणारे एक मोशन पोस्टर देखील रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरच्या बॅकग्राऊडला “मैं तो रस्ते से जा रहा था” या प्रसिद्ध गाण्याची म्यूझिक ऐकायला मिळते. १९९५ साली गोविंदाच्या चित्रपटाचा कुली नंबर १ हा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील डेविड धवनने केले होते. त्या चित्रपटात करिश्मा कपूर गोविंदासह मुख्य भूमिकेत होती. याच चित्रपटाचा रिमेक १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.