‘मिस्टर लेले’ मध्ये वरूणचा मराठमोळा अंदाज

mumbai

अभिनेता वरूण धवनाच्या चाहत्यांसाठी खूष खबर आहे. लवकरच वरूण मराठमोळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मिस्टर लेले’ असं या चित्रपटाचं नाव आहे आहे. तर दिग्दर्शक करण जोहर या चित्रपटाची निर्मीती करणार आहे. या चित्रपटाच पहिल पोस्टर प्रदर्शित झालं आहे. पोस्टरवरचा वरूणचा अंदाज बघून वरूण चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणार असच दिसतय. या चित्रपटाच्या निमित्ताने वरूण दिग्दर्शक शशांक खैतान यांच्याबरोबर तिसऱ्यांदा काम करणार आहे. शशांक खैतान आणि वरुणने याआधी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ आणि ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ या दोन चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.

या पोस्टरमध्ये वरुण हात वर करून घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. अंडरवेअरवर असलेल्या वरुणच्या एका हातात रिव्हॉल्वर आणि कमरेला फॅनी पॅक बांधलेला आहे. २०२१ या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असण्याची चर्चा आहे.

मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. याशिवाय त्याचा ‘कुली नंबर १’ हा चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये वरुण व सारा अली खान मुख्य भूमिका साकारत आहेत.सध्या वरुण त्याच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर 3D’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये त्याच्यासोबत नोरा फतेही, श्रद्धा कपूर यांच्या भूमिका आहेत.