घरमनोरंजन'मिर्झापुर'ची जोडी 'नेटफ्लिक्स'च्या या आगामी चित्रपटात एकत्र

‘मिर्झापुर’ची जोडी ‘नेटफ्लिक्स’च्या या आगामी चित्रपटात एकत्र

Subscribe

दोघांची केमिस्ट्री उत्कृष्ट असल्याने विर दे वेडिंग या चित्रपटाचे दिग्दर्शक शंशाक घोष यांनी या जोडीला पुन्हा एकत्र पडद्यावर आणले आहे.

काहीच दिवसांपुर्वी ‘मिर्झापुर’ वेबसिरीज सुपरहिट ठरली. यामध्ये गुड्डू भाईची भूमिका करणारा अली फजल सर्वत्र प्रसिद्ध झाला. यातील गुड्डू भाई या भूमिकेमुळे आजही अली त्याच नावाने ओळखला जातो. त्याच्या सोबत अभिनय करणारी सहकलाकार अभिनेत्री श्रेया पिळगांवकर यांच्यात चांगले प्रेम संबध दाखवण्यात आले होते. त्यात दोघांची केमिस्ट्री उत्कृष्ट असल्याने विर दे वेडिंग या चित्रपटाचे दिग्दर्शक शंशाक घोष यांनी या जोडीला पुन्हा एकत्र पडद्यावर आणले आहे.

- Advertisement -

अॅमेझॉनच्या मिर्झापुर या वेबसिरीज मधून एकत्र काम केल्यानंतर अली फजल आणि श्रेया पिळगांवकर नेटफ्लिक्सवरील आगामी चित्रपट ‘हाऊस अरेस्ट’मध्ये अभिनय करताना दिसणार आहे. ‘हाऊस अरेस्ट’या नेटफ्लिक्सवरील चित्रपटाचे दिग्दर्शन विर दे वेडिंग या चित्रपटाचे दिग्दर्शक शंशाक घोष यांच्या सह समित बासु या दोघांनी मिळून केले आहे. नुकतीच या चित्रपटाची शुटिंग दिल्लीमध्ये झाली.

- Advertisement -

अलीने या आगामी चित्रपटासंदर्भात बोलताना असे सांगितले की, या चित्रपटाची कथा मी करत असल्या भूमिकेभोवतीच फिरत राहत असून हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एकदम नवीन आणली चांगली असल्याने श्रेया सोबत पुन्हा अभिनय करण्यास उत्सुक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -