ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव अल्झायमर आजाराशी देतायत झुंज

veteran actress seema deo suffering from alzheimer by info son ajinkya deo on twitter
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव अल्झायमर आजाराशी देतायत झुंज

अनेक दशकांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव एका दुर्गम आजाराने त्रस्त असल्याचे समोर येतं आहे. सीमा देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. अजिंक्य देव यांनी त्यांच्या आईंना अल्झायमर आजारानं ग्रासलं असल्याचं सांगितलं आहे. सध्या त्या या दुर्गम आजाराशी झुंज देत आहेत.

अजिंक्य देव यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माझी आई श्रीमती. मराठी चित्रपटसृष्टीतील सीमा देव अल्झायमर या आजाराशी लढत आहेत. संपूर्ण देव कुटुंब ती लवकर बरी व्हावी यासाकरता प्रार्थना करत आहे. संपूर्ण महाराष्ट्राने तिच्यावर जे प्रेम केलं त्यांनीही तिच्याकरता प्रार्थना करावी.’

१९५७ सालीच ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. ‘आनंद’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ या नावाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा उमटवला. १ जुलै १९६३ रोजी सीमा आणि रमेश देव यांचा विवाह झाला. या दोन्ही कलाकारांकडे एव्हरग्रीन सेलिब्रिटी जोडी म्हणून पाहिले जाते.


हेही वाचा – आर के स्टुडिओची बॉलिवुडमध्ये नव्याने एन्ट्री