घरमनोरंजनशुटींगदरम्यान विकी कौशलला गंभीर दुखापत

शुटींगदरम्यान विकी कौशलला गंभीर दुखापत

Subscribe

तरूणाईंच्या दिलों की धडकन म्हणजे अभिनेता विकी कौशल. ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटानंतर विकी कौशल याने सगळ्यांच्याच मनात घर केलं. सध्या विकी कौशल दिग्दर्शक भानु प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमाचं शूटिंग करतोय. मात्र शुटींग दरम्यान विकी कौशलला गंभीर दुखापत झाली आहे. विकीच्या चेहऱ्यावर जवळपास 13 टाके पडले आहेत.

गुरूवारी रात्री एका अक्शन सीनच्या शुटींग दरम्यान विकी गंभीर जखमी झाला.विकीच्या चेहऱ्याला मार लागला आहे. त्याला एकूण १३ टाके पडले आहेत.  त्याला लगेचच स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर विकीला मुंबईच्या दवाखान्यात हलवण्यात आलं. विकीच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर लगेचच चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात होईल.

- Advertisement -

लवकरच विकी करण जोहरच्या ‘तख्त’ मध्ये दिसणार आहे. हा एक पीरियड वॉर सिनेमा असणार आहे जो अश्वत्थामा यांच्या आयुष्यावर आहे. या पौराणिक सिनेमात अश्वत्थामा यांची भूमिका विकी कौशल साकारणार आहे. विकीला अश्वत्थामा यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक असतीलच. विकी बॉलिवूडची ब्यूटी क्वीन अलियाबरोबर दिसणार आहे. तख्त हा देखील एक ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. हा चित्रपट मुघल शासनकाळ दाखवणारी एक कथा आहे. तख्त या चित्रपटाची करण जोहर निर्मीती करणार आहे. या चित्रपटात विकी- अलियासह रणवीर सिंग, करीना कपूर, जान्हवी कपूर, अनिल कपूर, आणि भूमी पेडणेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -