Video : अक्षय-परिणीतीने घेतली बीएसएफ जवानांची भेट!

केसरी या चित्रपटात अक्षय हवालदार ईश्वर सिंहची भूमिका साकारली आहे.

Mumbai
अक्षय-परिणीती

चित्रपटसृष्टीतील अभिनेते कलाकार आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी काही न काही वेगळे प्रयत्न करताना दिसतात. याच अभिनेत्यांमध्ये अक्षयकुमार आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी असेच अनोखे प्रयत्न करून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट असतो. यावेळी केसरी सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये जाऊन अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राने बीएसएफच्या जवानांची भेट घेतली. केसरीच्या निमित्ताने अक्षय आणि परिणीतीने बीएसएफच्या जवानांची भेट घेऊन त्याच्यासोबत वेळ घालवला. यावेळी केसरी सिनेमातील गाण्यांवर अक्षयसह जवानांनीही गाण्यावर ठेका ठरला. या सगळ्याचा व्हिडिओ पोस्ट करून बीएसएफसाठी संदेश देखील दिला आहे.

याशिवाय अक्षयने अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात अक्षय बीएसएफ महिला जवानासोबत फायटिंग करतांना दिसत आहे. या व्हिडिओवर अक्षयच्या चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. केसरी या सिनेमाच्या ट्रेलर पासून ते सिनेमातील गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

केसरी या चित्रपटात अक्षय हवालदार ईश्वर सिंहची भूमिका साकारली आहे. सिनेमाची कथा १८९७ साली झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारलेला आहे. या युद्धात २१ शिख सैनिकांनी १० हजार अफगाणी सैनिकांशी सामना केला होता. यांमध्ये ६०० लोक मारले गेले तर, ४८०० गंभीर जखमी झाले होते. यातील सगळे २१ सैनिक शहीद झाले होते.

२१ मार्चला प्रदर्शित

करण जोहर, हिरू यश जोहर, अरूणा भाटीया, अपूर्वा मेहता आणि सुनील खेतरपाल यांची निर्मिती असणारा केसरी हा सिनेमा होळीच्या दिवशी म्हणजेच २१ मार्च २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा अनुराग सिंह दिग्दर्शित असून अक्षय कुमार, परिणीती चोप्रा शिवाय भाग्यश्री आणि एडवर्ड दिसणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here