Video : सुशांतच्या घरातली पुजा, रिया मात्र गायब, पुजारींनी केला महत्वाच्या गोष्टीचा खुलासा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. सुशांतचे जुने व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर सुशांतच्या पूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा उलट सुलट चर्चेला सुरूवात झाली आहे. सुशांतच्या घरच्या पुजेचा हा व्हिडिओ आहे.

सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा आहे कारण सुशांतच्या घराच्या या पुजेला रिया चक्रवर्ती उपस्थित नव्हती. अशी माहिती पूजा करणाऱ्या पंडित गोविंद नारायण यांनी दिली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील केपरी हाइट्स इमारतीतील १५ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रुद्राभिषेकची पूजा करण्यात आली होती. या व्हिडीओमध्ये रिया चक्रवर्ती दिसत नाही. त्याच पूजेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंडित गोविंद नारायण शास्त्री यांनी सुशांतच्या या भाड्याने घेतलेल्या घराची पूजा केली होती. पुजेसाठी सुशांत सिंह राजपूत, त्यांची बहिण मीतू सिंह, बहिणीचे पती, कुटुंबातील काही सदस्य आणि सुशांतचा स्टाफ उपस्थित होता. या पुजेला रिया उपस्थित नव्हती. असे पंडित गोविंद नारायण शास्त्री यांनी सांगितले. रुद्राभिषेकची पूजा तब्बल ४ तास सुरू होती. सुशांतने सर्व विधी मनोभावे केले. ब्राह्मणांचे जेवण झाल्यानंतर पूजा संपेपर्यंत सुशांत उपस्थित होता. या पूजेसाठी ६-७ तास लागले.

“पूजेच्या वेळी सुशांत नैराश्यात आहे, असे वाटले नाही. सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर मोठा धक्का बसला”, असे शास्त्री म्हणाले. तसेच या प्रकारणाचा सीबीआयने तपास करावा अशी मागणी देखील त्यांनी या वेळी केली.


हे ही वाचा – ‘ज्या’ व्यक्तीवर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले ‘तो’ दोन दिवसांनी दारात हजर झाला आणि…