घरमनोरंजनपोपट झाला रे, ‘उरी’ची पायरेटेड कॉपी पाहणाऱ्यांना दणका

पोपट झाला रे, ‘उरी’ची पायरेटेड कॉपी पाहणाऱ्यांना दणका

Subscribe

'उरी' चित्रपटाच्या टीमने ही पायरेटेड आवृत्ती पाहणाऱ्या लोकांवर त्यांच्याच स्क्रीनच्या माध्यमातून 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. 

अनोखी शक्कल…

सहसा कुणीतरी थिएटरमध्ये चित्रपटाचं चोरून शुटिंग करतं आणि त्या व्हिडिओची लिंक टोरण्टसारख्या साइटवर लिक करतं. मात्र, इथे उरीच्या टीमनेच टोरण्टवर चित्रपट अपलोड केला असून, त्यांनीच  हे व्हिडीओ पायरसी करणाऱ्या साईटवर उपलब्ध करुन दिले आहेत. ३.८ जिबीची फाइल डाऊनलोड केल्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी जेव्हा व्हिडीओ प्ले होतो, तेव्हा त्यातून बेकायदेशीरपणे चित्रपट पाहणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला जातो. या व्हिडिओत चित्रपटाचे सेन्सॉर सर्टिफिकेट दाखवल्यानंतर पहिल्याच दृष्यामध्ये प्रमुख कलाकार विकी कौशल आणि यामी गौतम एका स्क्रीनसमोर बसून आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करताना दिसतात. यामध्ये काहीवेळ आपापसांत चर्चा केल्यावर चित्रपट चोरून पाहणाऱ्यांना यामी गौतम विचारते की, ‘तुम्हाला काय वाटले आपले लष्कर शत्रुच्या सीमेत घुसून त्यांना मारु शकते,  तर तुमच्या टोरण्टमध्ये आम्ही नाही घुसू शकत?’ यानंतर विकी कौशल रिमोटने टीव्हीची स्क्रीन ऑफ करुन टाकतो.

या भन्नाट व्हिडिओमधून ‘उरी’च्या टीमने पायरेटेड कॉपी पाहणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. पाहा या व्हिडिओची एक झलक…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -