घरमनोरंजनVideo: विद्या बालनचा हा ‘टिकटॉक’ व्हिडिओ होतोय व्हायरल

Video: विद्या बालनचा हा ‘टिकटॉक’ व्हिडिओ होतोय व्हायरल

Subscribe

विद्या बालनच्या या विनोदी व्हिडिओला चाहत्यांची पसंती

एकीकडे बॉलिवूड विश्वातील बरेच सेलिब्रिटी आपल्या म्हातारपणाचे फोटो शेअर करत असताना अभिनेत्री विद्या बालनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या विद्या बालन आपल्या आगामी चित्रपट मिशन मंगल या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. तिचा हा चित्रपट १५ ऑगस्ट प्रदर्शित होणार असून सध्या अभिनेत्री विद्या बालन तिच्या ‘टिकटॉक’ व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

Some Tak-Tuk Time Passsssssss ???????!

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

- Advertisement -

सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाऊंटवर विद्या बालनने तिचा विनोदी व्हिडिओ शेअर केला आहे. या टिकटॉक व्हिडिओमध्ये ‘शास्त्रों के अनुसार हर कुंवारी लड़की में ९ देवियों का वास होता है। लेकिन, लेकिन…शादी के बाद कौन सी देवी एक्टिव होगी, ये पति के कर्मों पर निर्भर करता है।’असा डायलॉग बोलताना दिसत आहे.

- Advertisement -

विद्या बालनने हा व्हिडिओ शेअर करताना ‘काहीतरी टॅकटुक टाईमपास।’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओला फक्त दोन तासांत १.३५ लाख व्ह्यूअरने बघितले आहे. विद्या बालनच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलेच पसंत केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -