Vinod Khanna Birth Anniversary: त्या सीनदरम्यान विनाद खन्नांचा कंट्रोल सुटला आणि माधुरी दीक्षित ओशाळल्या

Vinod Khanna and Madhuri Dixit kissing
विनाद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा दयावान चित्रपटातील गाजलेला सीन

Vinod Khanna Birth Anniversary: बॉलिवूडचा हँड्सम अभिनेता म्हणून विनोद खन्ना सर्वांनाच परिचित आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. विनोद खन्ना आपल्यात नाहीत, हे त्यांच्या चाहत्यांना पचवायला जड जाईल, पण तेच सत्य आहे. विनोद खन्ना यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा दयावान चित्रपटातील त्या सीनबद्दलचा किस्सा समोर येतो. विनोद खन्ना सिनेमातील पात्राशी एकरुप होऊन काम करायचे. त्यामुळेच त्यांच्यासोबत रोमँटिक सीन करताना अभिनेत्री घाबरायच्या. दयावान चित्रपटात देखील माधुरी दीक्षित सोबत असंच काहीसं झालं. विनोद खन्ना रोमँटिक सीनमध्ये इतके आकंठ बुडाले होते की, त्यांनी माधुरीच्या ओठांचा चक्का चावा घेतला.

vinod khanna and madhuri

माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीच्या अतिशय सुरुवातीच्या काळात तिला दयावान चित्रपट मिळाला होता. त्याआधी आणि नंतरही माधुरीने फार बोल्ड सीन दिलेले नाहीत. दयावान चित्रपटातही माधुरी त्या किसिंग सीनसाठी सहजासहजी तयार नव्हती. त्याला दुसरे कारण म्हणजे विनोद खन्ना आणि माधुरीमधील वयाचे फार मोठे अंतर. दिग्दर्शकाच्या आग्रहाखातर माधुरी दीक्षित हा सीन करण्यासाठी तयार झाल्या होत्या. त्यांना हा सीन एका टेकमध्येच संपवायचा होता. मात्र दिग्दर्शकाचे समाधान होत नसल्यामुळे हा सीन वारंवार शूट करावा लागत होता.

vinod khanna and madhuri dixit bold scene
दयावान चित्रपटातील सीन

टेक वर टेक दिल्यामुळे आधीच माधुरी दीक्षितला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. त्यात विनोद खन्ना यांना स्वतःवर नियंत्रण राखता येत नाही, ती भीती होतीच. शेवटी हा सीन फायनल झालाच. मात्र यावेळी विनोद खन्ना यांनी चुंबन घेत असताना माधुरी दीक्षित यांचा ओठाचा चावा घेतला. दिग्दर्शकाने कट बोलूनही विनोद खन्ना काही थांबायला तयार नव्हते. कसाबसा सीन आवरला गेला. त्यानंतर माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यात खटके उडाल्याच्या चर्चाही बाहेर रंगल्या होत्या.

मात्र विनोद खन्ना हे उत्तम कलाकार होते. त्या प्रसंगानंतर त्यांनी माधुरीची मोठ्या मनाने माफी मागितली. माधुरीनेही तो प्रसंग विसरुन आपल्या करियरची प्रगती नेटाने सुरु ठेवली. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट हिट झाले. अनेक चित्रपटांसाठी माधुरी दीक्षित यांनी पुरस्कारही पटकावले. तर विनोद खन्ना यांनी उतारवयात चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्याही चित्रपटांना चाहत्यांनी चांगली दाद दिली.