रणवीर सिंगच्या ‘हळदी’चे फोटो व्हायरल

रणवीर सिंगच्या 'हळदी' समारंभाचे फोटो सध्या व्हायलर होत आहेत. या फोटोंमध्ये रणवीरचा पांढऱ्या रंगाच्या कुर्तीमधील लूक सर्वांचाच लूक वेधून घेतो आहे.

Mumbai
viral photos of Ranveer Singh’s haldi ceremony at mumbai
सौजन्य-इन्स्टाग्राम

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ग्रँड वेडिंगची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दोघांच्यां चाहत्यांसह संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्री या लग्नाकडे डोळे लावून बसली असणार यात काही शंका नाही. एकीकडे लग्नाची तारीख जवळ येत असताना, या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोणने नंदी पूजा करुन लग्नविधीला प्रारंभ केला होता. यादरम्यानचे दीपिकाचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यापाठोपाठ आता रणवीर सिंगच्या ‘हळदी’ समारंभाचे फोटो व्हायलर होत आहेत. या फोटोंमध्ये रणवीर सिंगचा पांढऱ्या रंगाच्या कुर्तीमधील लूक सर्वांचाच लूक वेधून घेतो आहे. रणवीरच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला या फोटोंमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. यशराज फिल्म्सची कास्टिंग डिरेक्टर – शानू शर्मा या फोटोमध्ये रणवीर सिंहसोबत धमाल करताना दिसत आहे. प्रसिद्ध फोटोजर्नलिस्ट मानव मंगलानी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत.


वाचा: नंदीपूजा करून दीपिकाची लग्नविधीला सुरुवात

 

 


बॉलीवूडची सर्वात जास्त चर्चेत असणारी जोडी दीपिका आणि रणवीर या महिन्याच्या १४-१५ तारखेला लग्नबंधानात अडकणार आहेत. इंडस्ट्रीतले हे दोन लव्हबर्ड्स गेल्या ४ ते ५ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. याकाळात त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. काधी या दोघांनी अफेअरच्या बातम्यांचं खंडन केलं होतं, तर कधी मजा-मस्करीत या गोष्टीची कबुलीसुद्धा दिली होती. आता रणवीर आणि दीपिकाचं ग्रँड वेडिंग कसं रंगणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दीपिका आणि रणवीरने आतापर्यंत ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता ही जोडी पुन्हा ऑनस्क्रीन कधी दिसणार याबाबतही चाहते उत्सुक आहेत.