घरमनोरंजन'हम तुम और देम' वेब सिरीजमध्ये श्वेता तिवारी पुन्हा दिसली रोमँटिक अंदाजात

‘हम तुम और देम’ वेब सिरीजमध्ये श्वेता तिवारी पुन्हा दिसली रोमँटिक अंदाजात

Subscribe

'हम तुम और देम' या वेब सिरीजमध्ये श्वेता तिच्या चाहत्यांना एकदम बोल्ड अंदाजात बघायला मिळणार

टेलिव्हिजन विश्वात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या वेब सिरीजमुळे. एकता कपूरच्या कसोटी जिंदगी की या मालिकेमुळे घरा-घरात पोहोचलेली श्वेता आता वेब सिरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘हम तुम और देम’ या वेब सिरीजमध्ये श्वेता तिच्या चाहत्यांना एकदम बोल्ड अंदाजात बघायला मिळणार आहे. एकता प्रोडक्शनच्या अप ऑल्ट बालाजीच्या ‘हम तुम और देम’ या वेबसिरीजमध्ये श्वेता तिवारी लवकरच दिसणार असून यातील एक नवं गाणं नुकतंच रिलीज झाले आहे. या गाण्यात श्वेता तिवारी सह विवेक ओबेरॉय यांचा रोमँटिक अंदाजात दिसताय.

- Advertisement -

काही दिवसांपुर्वीच या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या सिरीजमध्ये श्वेता सिंगल पॅरेन्टची भूमिका साकारत असून तिला तिच्याच वयाच्या व्यक्तीशी प्रेम होते. मात्र श्वेता एका मुलीची आई असते तर तिचा प्रियकर हा अक्षय ओबेरॉय दाखवण्यात आला आहे. तो स्वतः तीन मुलांचा वडिल दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

श्वेता तिवारी या डिजीटल माध्यमात प्रथमच पदार्पण करत आहे. याच वेबसिरीजचे पहिले गाणं नुकतेच रिलीज झाले असून त्यात तिचा वेगळाच अंदाज बघायला मिळणार आहे.


हेही वाचा – सनी लिओनीच्या नव्या फोटोशूटने घातला धुमाकूळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -