घरमनोरंजनप्रिया वॉरियरचा Kissing सीन व्हायरल...

प्रिया वॉरियरचा Kissing सीन व्हायरल…

Subscribe

'श्रीदेवी बंगलो' या हिंदी चित्रपटातही प्रिया वॉरियर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

मागील वर्षात ‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून नवारुपाला आलेली प्रिया प्रकाश वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रिया वॉरियरचा २६ सेकंदाचा एक छोटासा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये  तिने एका मुलाकडे पाहून डोळा मारतानाचे जे काही एक्स्प्रेशन्स दिले होते, त्यावर संपूर्ण जग घायाळ झालं होतं. भारताबाहेरही हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. विशेषत: तरूणवर्ग या व्हिडिओनंतर प्रियाच्या अक्षरश: प्रेमात होता. त्या एका व्हिडिओमुळे रातोरात स्टार बनलेल्या प्रियाचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया चक्क आपल्या कोस्टारला ‘किस’ करताना दिसत आहे. रोशन असं तिच्या कोस्टारचं नाव असून, हा तिच्या जुन्या व्हिडिओमधलाच नायक आहे. दरम्यान, प्रिया आणि रोशनचा हा ‘किसिंग’ व्हिडिओ सध्या झपाट्याने व्हायरल होत आहे. प्रिया वॉरियरचे चाहते सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओलाही भरभरुन पसंती देत आहेत.

चाहत्यांसाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट

व्हायरल होत असलेला हा किसिंग सीन प्रिया प्रकाशच्या ‘ओरू अदार लव्‍ह’ या मल्ल्याळम डेब्यू चित्रपटातील आहे. हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रियाच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ची भेटच म्हणावी लागेल. यापूर्वी व्हायरल झालेला प्रियाचा ‘तो’ व्हिडिओसुद्धा ‘ओरू अदार लव्‍ह’ याच चित्रपटातील होता. चित्रपटातील ‘मनिक्य मलाराया पूवी’ या गाण्याचा तो व्हिडिओ होता. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या नव्या व्हिडिओमुळे फॅन्सची चित्रपटाविषयीची उत्सुकात वाढली असणार, यात काहीच शंका नाही.

- Advertisement -

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी बंगलो’ या हिंदी चित्रपटातही प्रिया वॉरियर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -