घरमनोरंजनस्टारकिड तैमुरनेही खेळली होळी, video व्हायरल

स्टारकिड तैमुरनेही खेळली होळी, video व्हायरल

Subscribe

भारताबाहेरही तैमुरचे अनेक चाहते आहेत. बॉलीवूडच्या सध्याच्या स्टारकिड्समध्ये तैमूर हा सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चिला जाणारा स्टारकिड आहे.

आज मुंबईसह राज्यभरात होळीनिमित्त रंगांची उधळण केली गेली. अक्षय कुमार, परिणीती चोप्रासह अनेक बॉलीवूड स्टार्सनीही आज होळीचे रंग खेळले. दुसरीकडे बॉलीवूडच्या स्टार्सकिड्सपैकी सर्वात लोकप्रिय स्टारकिड तैमुर अली खान यानेही आज होळी खेळली. सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत येत असतो. माध्यमकर्मी आणि पापराझींचाही तैमुर आवडता आहे. अशातच आज तैमुरचा खास होळी खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि शॉर्ट्स घातलेला तैमूर गॅलरीमध्ये उभं राहून पिचकारीतून पाणी उडवत आहे. तैमुरसोबत नेहमीच सावलीसारखी असणारी नॅनी यावेळीही त्याच्यासोबतच आहे. घराच्या गॅलरीमध्ये धुळवड साजरी करतानाचा तैमुरचे काही फोटो बॉलीवूड फोटोग्राफर विराल बयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Sweet #happyholi to #taimuralikhan dada and the smiling miss nanny ??

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisement -

तैमूर अली खानचे इतक्या लहान वयातच लाखो चाहते आहेत. भारताबाहेरही तैमुरचे अनेक चाहते आहेत. बॉलीवूडच्या सध्याच्या स्टारकिड्समध्ये तैमूर हा सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चिला जाणारा स्टारकिड आहे. सोशल मीडिया असो, वृत्तवाहिन्या असो किंवा अन्य माध्यमं, तैमूरची सगळीकडेच चलती आहे. बाबा सैफ अली खान आणि आई करिना कपूर यांच्यापेक्षाही बेबी तैमुरच आजकाल जास्त भाव खाऊन जातो. तैमुरच्या दैनंदिन घडामोडींवर त्याच्या चाहत्यांचं लक्ष असतं. माध्यमकर्मी आणि पॅपराझीसुद्धा तैमुरच्या सर्व हालचाली आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी नेहमीच तयार असतात. तैमुरचा गोंडस आणि खट्याळ अंदाज कुणालाही भुरळ घालेल असाच आहे.

 

View this post on Instagram

 

#taimuralikhan enjoying holi ?❤️❤️❤️ #happyholi . Feels like sunday morning today @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -