Video: पाहा विरुष्काचा लिपलॉक

विराट आणि अनुष्काचा या लिपलॉक व्हिडिओमुळे हे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत.

Mumbai

सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ फारच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी रंगलेल्या मुंबईतील ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स इव्हेंट’मधील आहे. ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स इव्हेंट’मध्ये ११ विविध क्रीडा स्पर्धांतील भारतीय खेळाडूंना गौरविण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये विराट आणि अनुष्काने जोड्याने हजेरी लावली होती. या व्हिडिओमध्ये विराट अनुष्कासोबत लिपलॉक करत आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

नक्की वाचा Video: भारतीय क्रिकेट टीम सोबत सेलिब्रेशन करताना दिसली अनुष्का

विराट आणि अनुष्काचा हा लिपलॉकचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला आहे. तसाच यापूर्वी या दोघांचा फिरोज शाह कोटला स्टेडियममधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अनुष्काला विराटचे कौतुक पाहून तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. यावेळी अनुष्का भावुक झाली आणि तिने विराटच्या हातात हात घेऊन हाताची किस घेतली.

या अगोदर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोला ३ तासात १५ लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केले होते. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

हेही वाचाविराटला भावले अनुष्काचे लहानपणीचे फोटो!