घरताज्या घडामोडीकरोना व्हायरसपासून बचाव करण्याकरिता लतादीदींच जुन गाणं व्हायरल

करोना व्हायरसपासून बचाव करण्याकरिता लतादीदींच जुन गाणं व्हायरल

Subscribe

जगभरात सर्वत्र करोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. या जागतिक महामारीमुळे चित्रपट, क्रिडा अशा क्षेत्रातील कार्यक्रमांना पूर्णविराम मिळाला आहे. या करोना व्हायरसमुळे काही बॉलिवूड कलाकार घरामध्ये वेळे घालवत आहेत. यादरम्यान भारतीय संघाचे माजी ओपनगर वीरेंद्र सेहवागने बॉलिवूडमधील एका जुन्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या जुन्या गाण्याचे असे बोल आहेत, ‘हाथ ना लगाइए…कीजिए इशारा दूर दूर से’ करोना व्हायरसपासून बचाव करण्याकरिता वीरेंद्र सेहवागने या वेगळ्या अंदाजामधील व्हिडिओ शेअर केला आहे. हे गाणं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलं आहे.

- Advertisement -

वीरेंद्र सेहवागने हा व्हिडिओ शेअर करताना त्याने नागरिकांना स्वच्छ राहण्याचे आवाहन केले आहे. सेहवागने शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. सेहवागच्या क्रिकेट खेळण्याच्या स्टाईलवर सर्व क्रिकेटप्रेमी फिदा असतात. सेहवाग हा आपल्या अनोख्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी या व्हिडिओला खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आतपर्यंत देशात करोना बाधितांची संख्या १४७वर पोहचली आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात करोना बाधितांची संख्या ४२वर पोहचली आहे. जगभरात १ लाख ९९ हजार ९९० करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८२ हजार ०२२ करोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – करोनामुळे पुण्यातील अनेकांनी लग्न ढकलली पुढे, बॉलिवूडकरांनाही लग्नाच्या तारखा बदलल्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -