विवेकला अजूनही ऐश्वर्याची आठवणं येते? एक्झिट पोलवर शेअर केलं मीम

mumbai
सौजन्य - टाईम्स ऑफ इंडिया

अभिनेता विवेक ऑबेरॉय याने जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. एक्झिट पोलच्या भाऊगर्दीत त्यावर भाष्य करणारं एक खोडसळं मीम त्याने त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केलं आहे. विशेष म्हणजे या मिममध्ये अभिनेता सलमान खानपासून अभिषेक बच्चनपर्यंत सगळे दिसत आहेत. मात्र यातील समांतर दुवा असलेली अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही केंद्रस्थानी आहे. त्यामुळे विवेकची पूर्व प्रेयसी असलेल्या ऐश्वर्याला विवेक अजूनही विसरू शकला नाही हेच यातून पाहायला मिळत आहे. शिवाय विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल कसे असतात? हे सांगण्यासाठी चक्क सलमान ऐश्वर्या प्रकरण उकरून काढले आहे. त्याच्या या खोडसळंपणाची दखल घेत महिला आयोगाने त्याला नोटीसही बजावली आहे.

काय आहे मीम 

एक्झिट पोलसमोर आल्यापासून हे मीम व्हायरल होते आहे. हेच मीम विवेक ओबेरॉयने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत एक्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानंतर त्याला ट्रोल व्हावे लागले आहे. हे मीम पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांच्या टीकेचा विवेक ओबेरॉयला सामना करावा लागला आहे. विवेक तुला काय झाले आहे? तुला असे करणे शोभते का? ऐश्वर्या रायच्या व्यक्तीगत आयुष्यावरून तू टीपण्णी का करतो आहेस ? हे आणि असे अनेक प्रश्न उपस्थित करत विवेक ओबेरॉयवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. तर काही नेटकऱ्यांनी विवेक ओबेरॉयबाबत इतर मीम करत त्याचीही खिल्ली उडवली आहे.

राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून लवकरच अभिनेता विवेक ऑबेरॉयला नोटीस बजावली जाणार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी 

महिलांचा अपमान करणार्‍या विवेक ऑबेरॉय याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. फिल्म अभिनेता विवेक ऑबेरॉय हे भाजपला समर्थन देवून महिलाबाबत मर्यादा सोडून अपशब्द बोलत आहेत. एका पद्मश्री मिळालेल्या महिलेचा अभिनेता विवेक ओबेरॉय एक्झिट पोलच्या नावाखाली अपमान करत आहेत. कुठे झोपलाय महिला आयोग, असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकार कारवाई का करत नाही. सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही तर जनतेमधून उद्रेक होईल. त्यामुळे सरकारने तात्काळ लक्ष घालावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here