पाहा – ऐश्वर्या राय- बच्चनच्या डोहाळे जेवणाचे फोटो

लग्नाप्रमाणेच अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा खाजगीत पार पडला होता. पण आता तब्बल आठ वर्षांनंतर ऐश्वर्याच्या डोहाळे जेवणाचे फोटो वायरल झाले आहेत.

Mumbai
Abhishek Bachchan And Wife Aishwarya Rai
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्या लाडक्या लेकीसह

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना आठ वर्षांची मुलगी आहे. आराध्य बच्चन असे तिचे नाव. आठ वर्षांपूर्वी ऐश्वर्याचे डोहाळे पार पडले होते. त्यावेळचे डोहाळे जेवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राय आणि बच्चन कुटुंबीय अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला आशिर्वाद देत आहेत. तर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातही पती अभिनेता अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्याची साथ सोडली नसल्याचे दिसते.

aishwarya-abhishek-babyshower-1

२००७ रोजी अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे विवाहबद्ध झाले. त्यानंतर लग्नाच्या ४ वर्षांनंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. तिचे नाव त्यांनी आराध्य असे ठेवले.

aishwarya-abhishek-babyshower- 4

लग्नाच्या फोटोंप्रमाणेच ऐश्वर्याच्या डोहाळे जेवणाचे फोटोही गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. अत्यंत खाजगी स्वरुपात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

aishwarya-abhishek-babyshower- 6

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला अभिनेता अभिषेक आणि अभिनेत्री ऐश्वर्या दोघांनीही सारख्याच रंगाचे मेहंदी ग्रीन रंगाचे आउटफिट्स घातले होते. यावेळी मेहंदी ग्रीन रंगाची साडी नेसलेल्या ऐश्वर्याचे सौंदर्य आणखीनच खुलले होते.

aishwarya-abhishek-babyshower- 2

डोहाळे जेवणातील एका फोटोमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या पाया पडून आशिर्वाद घेताना दिसते. २००७ मध्ये पार पडलेल्या शाही लग्नांपैकी एक म्हणून अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाची गणना होते.

aishwarya-abhishek-babyshower- 3

अभिनेत्री ऐश्वर्याच्या डोहाळे जेवणाच्या फोटोत ऐश्वर्याची आई वृंदा रायसुद्धा दिसत असून या फोटोत गरोदर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलले आहे.