घरमनोरंजननिर्भया बलात्कार प्रकरणावर वेब सीरिज; ट्रेलर प्रदर्शित

निर्भया बलात्कार प्रकरणावर वेब सीरिज; ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

निर्भया बलात्कार प्रकरणावर एक वेब सीरिज येत आहे. २२ मार्चला ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. तर नुकतेच या वेब सीरिजचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे.

काही वर्षांपुर्वी संपूर्ण देशाला हदरून टाकणारी घटना घडली होती. ही घटना म्हणजे राजधानी दिल्लीत झालेली निर्भया बलात्कार प्रकरण. सन १६ डिसेंबर २०१२ मध्ये ही घटना घडली आहे. या सामुहिक बलात्कारातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली होती. तसेच बलात्काराच्या शिक्षेमध्ये तरतूद करण्यास या प्रकरणाच्या दरम्यान न्यायालयाला भाग पाडले होते. या प्रकरणानंतर देशभरात संतापची लाट उसळली होती. याच सत्य घटनेवर इतक्या वर्षांनी ‘दिल्ली क्राइम’ही वेब सीरिज येत आहे. तर या वेब सीरिजचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

ट्रेलरमध्ये काय?

ही वेब सीरिज निर्भया प्रकरण झाल्यानंतरच्या संपूर्ण तपासावर आधारित आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन इंडो-कॅनेडियन दिग्दर्शक रिची मेहता यांनी केले आहे. शेफाली शाह, रसिका दुग्गल, राजेश तैलंग, आदिल हुसैन, गोपाल दत्त आणि विनोद शेरावत यांच्या या वेब सारिजमध्ये मुख्य भूमिका आहेत. या बलात्कार प्रकरणी एका महिला पोलीस अधिकारीनी आरोपीयांचा शोध कसा लावला हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

https://www.youtube.com/watch?v=ZTeFU0NqIWo

‘दिल्ली बस’ चित्रपट देखील आला

या वेब सीरिजसाठी गेल्या सहा वर्षांपासून संशोधन सुरू होते. दिल्लीतल्या सहा वेगवेगळ्या ठिकाणी या वेब सीरिजचे चित्रीकरण झाले आहे. दिग्दर्शक रिचा मेहता यांनी ‘अमाल’, ‘आय विल फॉलो यु डाऊन’, अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ‘दिल्ली क्राइम’ ही त्यांची वेब सीरिज २२ मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षीत या घटनेवर ‘दिल्ली बस’ या चित्रपट देखील आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -