‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं’

वेडिंगचा सिनेमा या चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं....” प्रकाशीत करण्यात आले. हे गाणं डॉ सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकर यांनी गायलं आहे.

Mumbai
wedding cha shinema
वेडिंगचा शिनेमा

संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला वहिला चित्रपट म्हणजे ‘वेडिंगचा शिनेमा’. या चित्रपटाची त्याच्या नावाइतकीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची गाणी संदीप खरे यांनी लिहिली आहेत. त्यामुळे या चित्रपटाची आणखी उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचं आणखी एक गाणं नुकताच लॉंच करण्यात आलं आहे. “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं…कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं….” प्रकाशीत करण्यात आले. हे गाणं डॉ सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकर यांनी गायलं आहे.

काय आहे गाण्यात

पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते आणि त्याचे निमंत्रण पक्याचे भाचे गाणे गावून देतात. “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं…कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं….माझ्या मामाच्या लग्नाची गेली बातमी वाऱ्याला…” असे या गाण्याचे बोल आहेत. १४ वर्षीय शुभंकरने हे गाणं गायलं आहे. या आधी शुभंकरने ‘चिंटू’ या मराठी चित्रपटात पहिलं गाणं गायलं होतं. ‘वेडिंगचा शिनेमा’मधील या गाण्यात त्याला आर्या आंबेकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी साथ दिली आहे.

पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

लग्नात तगड्या स्टार कास्टची मंदीयाळी

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, आलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तराडे, संकर्षण कऱ्हाडे,प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत, शिवराज वायचळ आणि रूचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’च्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचा संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’मधील सलील कुलकर्णी यांचा सहकारी आणि प्रख्यात कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत.“माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं ह…कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं ह….” हे गाणेही त्यातीलच एक आहे. याआधी प्रकाशित करण्यात आलेल्या याधीच्या दोन्ही गाण्यांना आणि टीझरला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here