घरमनोरंजनपक्याप्रमाणे करा 'प्रेयसीला प्रपोज'

पक्याप्रमाणे करा ‘प्रेयसीला प्रपोज’

Subscribe

'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमीवर एक भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील हे गाणं असून हे तरूणांना नक्कीच वेड लावणार आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर एक भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील हे गाणं आहे. “बोल बोल पक्या, काहीतरी बोल पक्या…अरे भीड ना, अरे नड कि, काहीतरी बोल पक्या…” अशा आशयाचे हे गाणं तरूणांना नक्कीच वेड लावणार आहे. गाण्याप्रमाणेच चित्रपट ही प्रेक्षकांना आवडेल यात शंकाच नाही. येत्या ११ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षागृहात दाखल होणार आहे.

सध्या सगळे यंगस्टर्स ‘व्हॅलेंटाईन डे’ ला काय स्पेशल करता येईल? किंवा एखाद्या मुलीला प्रपोज करण्यासाठी काय काय करावं लागेल याच्या तयारीला लागले आहेत. त्याचप्रमाणे चित्रपटाचा नायक पक्याही प्रेयसीला प्रपोज करण्याची तयारी करतोय. या कामात त्याचा मित्र सुहृद त्याला मदत करतोय. आता पक्या तिला प्रपोज करेल का हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळणार आहे.

- Advertisement -

काय आहे गाण्यात

“बोल बोल पक्या, काहीतरी बोल पक्या…अरे भीड ना, अरे नड कि, काहीतरी बोल पक्या…” अशा आशयाचे हे ‘वेडिंगचा शिनेमा’मधील गाणे खूपच धमाल आहे. या गाण्यात त्याच्या आजूबाजूचे सर्वच त्याला त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची गळ घालत आहेत. पक्याला मात्र परीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ हे सांगण्याची हिंमत होत नाही. पक्याची नेमकी स्थिती आणि द्विधा मनस्थिती या गाण्यातून नेमकी उधृत झाली आहे. हे गाणे शिवराज वायचळ, ऋचा इनामदार आणि प्रवीण तराडे यांच्यावर चित्रित झाले असून हे गाणे अवधूत गुप्ते यांनी गायले आहे.

तर शिवराज वायचळ, ऋचा इनामदार या नव्या जोडीचे चंदेरी पडद्यावरील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. त्यांच्याशिवाय चित्रपटात मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तराडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे आदींच्या भूमिका आहेत. तर संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट असून त्याच्या या नव्या पर्वाची मराठी चित्रपटसृष्टीत सर्वांनाच उत्सुकता आहे. येत्या १२ एप्रिल २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

- Advertisement -

वाचा – सलील घेऊन येतोय ‘वेडिंगचा शिनेमा’

वाचा – मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स, धोका आणि शोध; ‘बदला’ चा ट्रेलर लाँच!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -